ETV Bharat / entertainment

Nargis Fakhri Exclusive : अभिनेत्री नरगिस फाकरीचा चार वर्षानंतर कमबॅक, ईटीव्ही भारतशी संवाद साधताना म्हणाली - 'मला मोठ्या पडद्यावर...'

author img

By

Published : Feb 10, 2023, 3:08 PM IST

Updated : Feb 11, 2023, 1:37 PM IST

अनुपम खेर-नीना गुप्ता स्टारर शिव शास्त्री बाल्बोआ हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात कौटुंबिक मनोरंजनाचे संपूर्ण पॅकेज आहे. हा चित्रपट तुम्ही कुटुंबासह पाहु शकता. या चित्रपटात अनुपमची ओळख बॉक्सर म्हणून नाही तर सुवर्णपदक जिंकणाऱ्या बॉक्सरला प्रशिक्षण देणारी व्यक्ती म्हणून करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अजयन वेणुगोपालन आणि अभिनेत्री नरगिस फाकरीसोबत यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला आहे.

Nargis Fakhri Exclusive
अभिनेत्री नरगिस फाकरीचा चार वर्षानंतर कमबॅक

दिग्दर्शक अजयन वेणुगोपालन आणि अभिनेत्री नरगिस फाकरीसोब खास संवाद

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर आणि नीना गुप्ता या जोडीने आपल्या अभिनयाची शानदार झलक दाखवली आहे. चित्रपट निर्मात्यांनी शुक्रवारी म्हणजेच आज हा चित्रपट रिलीज केला आहे. या चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, अभिनेत्री नीना गुप्ता, नरगिस फाकरी, शारीब हाश्मी, जुगल हंसराज आणि इत्यादी. कलाकार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक अजयन वेणुगोपालन आणि अभिनेत्री नरगिस फाकरीसोबत यांनी ई-टिव्ही भारतशी संवाद साधला आहे. चला तर पाहूयात मग ते काय म्हणाले.

1. शिव शास्त्री बाल्बोआ चित्रपटा बद्दल तुम्हाला कसे वाटत आहे ? : दिग्दर्शक अजयन वेणुगोपालन म्हणाले, मी खूप उत्साहित आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच दिल्लीत स्क्रीनिंग झाले होते. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मला वाटते की, सगळ्यांनी हा चित्रपट पाहावा. 2. नरगिस 4 वर्षांनी बाॅलीवूडमध्ये कमबॅक केला आहेस. काय भावना आहेत ?मी सुपर एक्सायटेड आहे. कोविड संपला आहे आणि मी आता कामावर परतण्यासाठी खूप उत्साहित आहे. मला पुन्हा मोठ्या पडद्यावर यायचे आहे आणि मी पुन्हा मुंबईला येण्यास उत्सुक आहे.

3. नरगिस या चित्रपटातील तुझा अनुभव कसा होता ? : चित्रपटातील माझा अनुभव खूपच चांगला होता. मी खूप आनंदी आहे. मला स्क्रिप्ट खूप आवडती. या चित्रपटात खूप वास्तविकता आहे. त्यासोबतच या चित्रपटाची कहाणी खूपच रिलेटेबल वाटेल अशी आहे. जेव्हा मी या चित्रपटाटी कथा वाचली तेव्हा मला माझे पात्र तर आवडलेच पण मला इतर पात्रेही तितकेच आवडले. या चित्रपटातून चांगला संदेश मिळेल. 4. नरगिस या चित्रपटातील तुझ्या पात्राबद्दल काय सांगशील ? : माझ्या पात्राचे नाव सिया आहे. या चित्रपटातील माझे पात्र खूप मजेदार आणि प्रेम करणारे पात्र आहे. या चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा खूप वेगळी आहे आणि ती पूर्णपणे खरी आहे. या चित्रपटात मी गर्ल्स नेक्स्ट डोअर आहे. मी आशा करते की, सगळ्यांना माझे पात्र खूप आवडेल.

5. अजयन या चित्रपटाची कथा अनुपम खेर-नीना गुप्ता यांना ऐकवली, तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती : अनुपम खेर-नीना गुप्ता यांना या चित्रपटाची कथा खूप आवडली. त्यांनी कसलाही विचार न करता लगेचच या चित्रपटासाठी हो सांगितले. तसेच नर्गिसने मला तिच्या भूमिकेबद्दल विचारले नाही. माझी भूमिका किती मोठी आहे हेही मला विचारले नाही. मला ही स्क्रिप्ट खूप आवडली आणि मला त्यात काम करायचे आहे, असे नरगिस त्यावेळी म्हणाली. माझे काम खूप सोपे होते. कारण त्यांना स्क्रिप्ट खूप आवडली असून त्यांना हा संपूर्ण प्रोजेक्ट आवडला होता. हा एक सुंदर चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस नक्की उतरेल.

6. नरगिस जी यांनी अनुपमजींसोबत यापूर्वीही काम केले आहे, त्यांच्यासोबतचा अनुभव कसा होता ? : अनुपमजींसोबत काम करणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. यावेळी मला एक वेगळाच माहोल मिळाला आहे. सेटवर आणि पडद्यावरचा प्रत्येकजण आम्हाला कुटुंबासारखा वाटत होता. त्यांच्याकडून मला बरेच काही शिकायला मिळाले. मला त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळतात. त्यांनी मला खूप सल्ले दिले आहेत. हा चित्रपट बघितल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटेल.

हेही वाचा : Vishal Bhardwaj's Fursat : 'फुरसत'साठी ईशान खट्टर, वामिका गब्बीने काळाचे भान हरपून केला नृत्याचा सराव

Last Updated : Feb 11, 2023, 1:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.