वाराणसी - Nana Patekar in Varanasi : बनारस शहर हे हिंदी फिल्म इंडस्ट्री आणि भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीचं आवडतं चित्रीकरण स्थळ बनलंय. आपल्या अभिनयाचा दरारा असलेला नाना पाटेकर सध्या वाराणसीत दाखल झालाय. 'गदर'सारखा हिट चित्रपट देणाऱ्या अनिल शर्माच्या आगामी ‘जर्नी’ या चित्रपटात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या नाना वाराणसीमध्ये काही दिवस ‘जर्नी’ चित्रपटाचं शूटिंग करणार आहे. नानानं शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या.
नाना पत्रकारांशी संवाद साधताना अनेक विषयावर बोलला. तो म्हणाला की शूटिंग सुरू असतं तेव्हा तो त्या शहरात थांबतो, मात्र संपल्यानंतर तातडीन पुण्याजवळील शेतात जाऊन राहतो. नाना स्वतः शेतात पीक घेतो आणि सामान्य शेतकऱ्यासारखं जगतो.
पंजाबमध्ये शेतकरी पेंढा जाळतात त्यामुळं प्रदूषण होतं याकडे लक्ष वेधलं असता नाना म्हणाला की, पीकाचा खुंट किंवा पेंढा जाळणं हा पर्याय नाही. हा एक पर्याय असल्याचं शेतकऱ्यांना वाटतं. पण त्यामुळे प्रदूषण वाढतं. नानानं सांगितलं की, तो त्याच्या शेतातील पेंढा अजिबात जाळत नाही. त्याच्याकडे सध्या 11 गायी आणि तीन बैलं आहेत. या गुरांना तो हा पेंढा चरायला देतो. त्यामुळे शेतकऱ्यांकडे हा पर्याय असल्याचं तो म्हणाला. पेंढा जाळताना शेतकऱ्यांनी विचार करायला हवा, त्याला पर्याय शोधायला हवा. यासाठी सरकार काहीही करणार नाही. लोकांनाच वाटलं पाहिजे की हे चुकीचं आहे. आपण हे जर केलं नाही तर एक दिवस याचा भुर्दंड आपल्याला भरावा लागणार आहे. नाना म्हणाला की सरकारनंही यांचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे. तिथं अनेक अनुभवी लोक बसले आहेत. यातून मार्ग काढणं आवश्यक आहे. यातून अनेक वर्षांच्या या समस्येचं निराकारण होऊ शकत.
नाना पाटेकर काही दिवसांसाठी वाराणसीत आलाय. शूटिंगमळे तो बाहेर फिरलेला नाही. यावर मंदिरात जाऊन देवालाही वारंवार त्रास देण्याची इच्छा नसल्याचं तो म्हणाला. 'मला देवाशी बोलायचे असते तेव्हा मी कुठेही हात जोडतो. मी देवाकडे का जावे? मला जे हवं होतं ते त्यांनी मला दिले आहे. मला आता त्यांना त्रास द्यावासा वाटत नाही. आम्ही वर गेल्यावर बोलू,' असं नाना म्हणाला.
चित्रपटांमध्ये सनातन धर्माचा अपमान होत असल्याच्या मुद्द्यावर नाना म्हणाला की, चित्रपटांमध्ये कोणत्याही धर्माचा अपमान होता कामा नये, यासाठी आपल्याला हे पाहावे लागेल. तो म्हणाला की, सनातन सेन्सॉर बोर्ड तयार करण्याची गरज आहे की नाही हे मला माहीत नाही, परंतु यासाठी प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी आहे. जर तो हिंदू असेल तर तो मुस्लिम, ख्रिश्चन, जैन या सर्वांना आदर देईल ही त्याची जबाबदारी आहे. एखादा चित्रपट वादग्रस्त असेल तर तो पाहू नका.
‘तिरंगा’ चित्रपटातील शिवाजी वागळे यांची भूमिका पुन्हा साकारण्याच्या प्रश्नावर नाना पाटेकर म्हणाले की, मी त्यावेळी तरुण होतो. आता मला माहित नाही की मी ही व्यक्तिरेखा साकारू शकेन की नाही. 35 वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी बनारसला आल्याचं नानानं सांगितले. येथील छितौनी गावात शूटिंग करण्यात आलं होतं. यानंतर तो पुन्हा बनारसला आलाय. पूर्वीच्या बनारस आणि आजच्या बनारसमध्ये खूप फरक आहे. आता जुनं बनारस कुठेतरी हरवलं असल्याचंही नाना म्हणाला.
हेही वाचा -