हैदराबाद - दक्षिणेतील अभिनेता नागा चैतन्य 23 नोव्हेंबर रोजी 36 वर्षांचा झाला आहे. नागाचा जन्म 23 नोव्हेंबर 1986 रोजी हैदराबादमध्ये झाला होता. नागा हा टॉलीवूडचा राजा अक्किनेनी नागार्जुनचा मुलगा आहे. या खास प्रसंगी नागाने त्याच्या चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. नागाच्या 'कस्टडी' या नव्या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.
व्यंकट प्रभू दिग्दर्शित 'कस्टडी' चित्रपटातील फर्स्ट लूकमध्ये नागा एका दमदार भूमिकेत दिसत आहे. पोलिसांनी अभिनेत्याला चारही बाजूंनी घट्ट पकडले असून त्याच्या डोक्यावर बंदूक रोखली आहे. नागा त्याच्या व्यक्तीरेखेनुसार पूर्णपणे दबंग शैलीत दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'कस्टडी' हा नागा चैतन्यचा 22 वा चित्रपट आहे. हा चित्रपट तेलगू आणि तामिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक व्यंकट प्रभू आहेत आणि चित्रपटाचे निर्माते श्रीनिवास चित्तुरी आहेत. चित्रपटातील उर्वरित स्टारकास्टचा खुलासा झालेला नाही. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबतही माहिती देण्यात आलेली नाही.
'लाल सिंह चड्डा'मध्ये दिसला होता नागा चैतन्य - नागा चैतन्य अखेरचा बॉलिवूड चित्रपट 'लाल सिंह चड्ढा'मध्ये दिसला होता. या चित्रपटात तो बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानसोबत दिसला होता. या चित्रपटात त्याने एका सैनिकाची भूमिका साकारली होती, पण बॉलीवूड बॉयकॉटमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आणि चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान नागाने त्याची पत्नी समंथा रुथ प्रभूपासून घटस्फोट घेतला.
लग्नाला चार वर्षे - नागा आणि साऊथची सुपरहिट अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू यांनी 2017 मध्ये शाही पद्धतीने लग्न केले, परंतु लग्नाच्या चार वर्षानंतरच नागा आणि सामंथा यांनी परस्पर मतभेदांमुळे घटस्फोट घेतला. आता हे जोडपे पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - ओटीटीवर दिसत असताना पैसे खर्च करुन लोक थिएटरमध्ये सिनेमा का पाहतील, आर बाल्कींचा सवाल