मुंबई - पॉवर हाऊस परफॉर्मर रणवीर सिंग याचा 'जयेशभाई जोरदार' चित्रपटाचा जोरदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात रणवीर अत्यंत वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. एक जोरदार सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट भरपूर मनोरंजक आहे हे ट्रेलरवरुन स्पष्ट दिसत आहे.
-
RANVEER SINGH: 'JAYESHBHAI JORDAAR' TRAILER OUT NOW... #YRF unveils #JayeshbhaiJordaarTrailer, starring #RanveerSingh in the title role... #JayeshbhaiJordaar is directed by #DivyangThakkar... 13 May 2022 release.pic.twitter.com/KMFaKrCAmP
— taran adarsh (@taran_adarsh) April 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">RANVEER SINGH: 'JAYESHBHAI JORDAAR' TRAILER OUT NOW... #YRF unveils #JayeshbhaiJordaarTrailer, starring #RanveerSingh in the title role... #JayeshbhaiJordaar is directed by #DivyangThakkar... 13 May 2022 release.pic.twitter.com/KMFaKrCAmP
— taran adarsh (@taran_adarsh) April 19, 2022RANVEER SINGH: 'JAYESHBHAI JORDAAR' TRAILER OUT NOW... #YRF unveils #JayeshbhaiJordaarTrailer, starring #RanveerSingh in the title role... #JayeshbhaiJordaar is directed by #DivyangThakkar... 13 May 2022 release.pic.twitter.com/KMFaKrCAmP
— taran adarsh (@taran_adarsh) April 19, 2022
जयेशभाईचे वडील गावचे सरपंच आहे. त्यांच्यानंतर जयेश सरपंच होणार आहे. मात्र त्याच्यानंतर सरपंच जयेशचा मुलगाच होईल अशी अटकळ आहे. पण जयेशला मुलगी होते आणि त्याच्या आयुष्यात वादळ निर्माण होते. मुलगीही कमी नसतात, मुलगा किंवा मुलगी याचा जन्म आईच्या हाती नसतो तर तो वडीलाच्या हाती असतो असा महत्त्वाचा संदेश या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
रणवीर सिंगने जयेशभाईची भूमिका जोरदार केली आहे. बोमन इराणी यात त्याच्या वडिलाच्या भूमिकेत तर रत्ना पाठक आईच्या भूमिकेत आहे. दिव्यांग ठक्कर यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट १३ मे २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
हेही वाचा - रणबीर कपूरचे आलियाच्या मैत्रिणींसह मजा मस्तीचे फोटो व्हायरल