ETV Bharat / entertainment

Priyanka Nick Jonas Valentines Day : मधुर संगीत, स्वादिष्ट भोजन आणि सुंदर नजारा! प्रियंका चोप्रा आणि निक जोनासने साजरा केला व्हॅलेंटाईन डे - हॉलीवूड चित्रपट लव्ह अगेनचा ट्रेलर

प्रियांका चोप्राची निक जोनाससोबतची प्रेमकहाणी परीकथांमध्‍ये शोभणारी अशीच आहे. व्हॅलेंटाईन डेच्या या लव्हबर्ड्सने आपल्यातील नाते घट्ट केले आणि गत आयुष्याच्या आठवणी जागवल्या. सोशल मीडियावर निकयंकाने त्यांच्या व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनचे काही सुंदर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

Priyanka Nick Jonas Valentines Day
Priyanka Nick Jonas Valentines Day
author img

By

Published : Feb 15, 2023, 12:45 PM IST

मुंबई - व्हॅलेंटाईन डेचा बहर अद्यापही संपलेला नाही. आपल्या प्रिय व्यक्तीसोबत हा प्रेमाचा दिवस साजरा केल्यानंतर त्याच धुंदीत सेलेब्रिटी अजूनही वावरत आहेत. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनची झलक शेअर करत आहेत. प्रियांका चोप्राची निक जोनाससोबतची लव्ह केमेस्ट्री व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने पुन्हा एकदा जगासमोर आली आहे.

प्रियंका आणि निक यांना निकयंका या टोपण नावाने ओळखले जाते. त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील चाहत्यांसाठी भरपूर शिदोरी इनस्टाग्रामवर पुरवली आहे आणि एकमेकांसाठी प्रेमाने भरलेले संदेश शेअर केले. त्यांच्या व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन पाहता असे दिसते की या जोडप्याने एकत्र चांगला वेळ घालवला आहे. प्रियंकाने सांगितले की प्रत्येक दिवस निकसोबत व्हॅलेंटाईन डे आहे, तर अमेरिकन गायक निकनेने देसी गर्लला आपेल हृदय असल्याचे म्हटले आहे. दोघांचीही प्रेमकहाणी परीकथांमध्‍ये शोभणारी अशीच आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने या प्रमी युगुलाने आपल्यातील प्र्माचे नाते घट्ट केले आणि आजवर जगलेल्या आयुष्याच्या आठवणी पुन्हा जागवल्या. सोशल मीडियावर प्रियंका आणि निक जोनासने त्यांच्या व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनचे काही सुंदर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

प्रियांकाने इंस्टाग्रामवर व्हॅलेंटाईन डेच्या दोन फोटोंचा सेट शेअर केला. पहिल्या फोटोत प्रियांका आणि निक एकत्र दिसत आहेत, तर दुसर्‍या इमेजमध्ये कॅलिफोर्नियातील पिंटो लेकजवळ तिची मुलगी मालती मेरीसोबत प्रियंका बदकांना खायला घालत आहेत. तिने इंस्टाग्राम स्टोरीजवर स्वतःचा अंथरुणावरचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की प्रत्येक दिवस तिच्या आणि निकसाठी व्हॅलेंटाईन डे आहे.

दरम्यान, निकने बुधवारी सकाळी एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये प्रियांका लाइव्ह म्युझिक सुरू असताना बसलेली आणि त्याचा हात धरताना दिसत आहे. उत्तम स्वादिष्ट भोजन आणि सुंदर दृश्यासह, या जोडप्याने वंश, खंड आणि वांशिकतेच्या सीमा ओलांडत त्यांचा व्हऍलेंटाईन डे साजरा केला व या दिवसाच्या आठवणी जमा केल्या. निकयंकाने शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांना छान वाटत आहेत. दोघांचेही फॅन्स त्यांना भरभरुन शुभेच्छा देत, त्यांनी भावी आयुष्यातही असेच प्रेमाच्या अतुट बंधनात रहावे अशी अपेक्षा करत आहेत.

प्रियांकासाठी व्हॅलेंटाईन डे आणखी खास होता कारण तिच्या आगामी हॉलीवूड चित्रपट लव्ह अगेनचा ट्रेलर प्रेमाच्या दिवशी रिलीज करण्यात आला. प्रियंका चोप्राने तिच्या सोशल मीडिया हँडलवर ट्रेलर शेअर केला तर तिच्या पतीनेही त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर व्हिडिओ शेअर केला आणि प्रियांकाची प्रशंसा केली.

हेही वाचा - Actors Leaving The Tarak Mehta Show : तारक मेहता...शो सोडलेल्यांचे पैसे थकले? निर्मात्यांनी सोडले मौन, म्हणाले, 'कलाकारांचे कष्टाचे पैसे...'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.