ETV Bharat / entertainment

Movie Teen Adakun Sitaram : आलोक राजवाडेचा लंडनमध्ये झाला होता 'तीन अडकून सीताराम' - Actor Alok Rajwade

Movie Teen Adakun Sitaram : 'तीन अडकून सीताराम' असे शीर्षक असलेला चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. तीन अडकून सीताराम ही एक म्हण आहे अडचणीत सापडलेल्या व्यक्तीसाठी लागू होणारी. अशीच अवस्था या सिनेमाचं शुटिंग लंडनमध्ये सुरू असताना अभिनेता अलोक राजवाडेची झाली होती. त्यावेळी त्याच्यासाठी प्राजक्ता माळीने मदतीचा हात पुढे केला होता.

Movie Teen Adakun Sitaram
तीन अडकून सीताराम
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 2:37 PM IST

मुंबई - Movie Teen Adakun Sitaram : कुठेही पर्यटनाला जाताना खिशात पुरेसे पैसे असणे गरजेचे असते. हल्लीचा काळ डिजिटल पेमेंट्सचा आहे त्यामुळे अनेकजण आता क्रेडिट कार्ड वा डेबिट कार्डचा पर्याय वापरतात. परंतु ते सर्व टेक्नॉलॉजीवर अवलंबून असल्याकारणाने कधी घात होण्याचा संभव असतो. जर का ती कार्ड्स चोरीला गेली तर त्याचा गैरवापर होऊन आर्थिक फटकाही बसतो. तर कधी कधी तांत्रिक अडचणींमुळे त्या कार्ड्समधील पैशांचा वापर करता येत नाही. त्यात परदेशी असल्यामुळे कोणाकडे उधारही मागता येत नाही.अशावेळी पैसे असूनही काही खरेदी करता येत नाही. थोडक्यात तोंड दाबून बुक्क्यांचा मार. तीन अडकून सीताराम ही एक म्हण आहे अडचणीत सापडलेल्या व्यक्तीसाठी लागू होणारी. अशीच काहीशी वेळ आली होती अभिनेता आलोक राजवाडेवर.

त्याचे झाले असे की हृषिकेश जोशी लिखित, दिग्दर्शित 'तीन अडकून सीताराम' या चित्रपटाचे युनिट गेले होते लंडनला. तिथेच चित्रपटाचे बहुतांश शुटींग होणार होते आणि झालेही. परंतु हा 'सीताराम' चा गोतावळा लंडनला पोहोचला तेव्हा त्यांना कळले की त्यांनी ठरविलेल्या लोकेशनवर शूटिंग होऊ शकणार नाही. कारण त्यावेळी इंग्लंडची राणी एलिझाबेथचे निधन झाले होते आणि दहा दिवसांचा राष्ट्रीय दुखावटा जाहीर करण्यात आला होता. सर्वजण हिरमुसले होते कारण त्यांचे दहा दिवस फुकट जाणार होते. सर्वात जास्त हिरमुसली होती ती म्हणजे चित्रपटाची नायिका प्राजक्ता माळी. लंडनला जाणार म्हणून ती भरपूर शॉपिंगचे मनसुबे रचवून मुंबईतून निघाली होती. तिला भरपूर प्रमाणात ब्रँडेड सौंदर्य प्रसाधनं आणि कपडे खरेदी करायचे होते. आणि त्यासाठी तिने भरपूर पौंड्ससुद्धा (ब्रिटिश चलन) सोबत घेतले होते. परंतु बदललेल्या शेड्युलमुळे तिला खरेदीला वेळच मिळाला नाही.

'तीन अडकून सीताराम'मध्ये वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे आणि प्राजक्ता माळी सोबत आलोक राजवाडेही प्रमुख भूमिकेत आहे. आलोक राजवाडेलासुद्धा लंडनमध्ये काही महत्वाच्या खरेदी करायच्या होत्या. परंतु तो जेव्हा खरेदीला गेला तेव्हा त्याला अपेक्षाभंग अनुभवावा लागला. कारण जे हवे ते रास्त किमतीत मिळत होते परंतु पेमेंट करताना त्याचे कार्ड चालत नव्हते. त्यामुळे त्याला रिकाम्या हाताने परत यावे लागले. त्यामुळे तो उदास होता परंतु ही गोष्ट प्राजक्ताला शेवटच्या दिवशी कळली आणि तिने त्याला पैसे उधार दिले कारण तिला हवे तेवढे शॉपिंग करायलाच मिळाले नव्हते आणि त्यामुळे तिच्याकडे भरपूर इंग्लडचे पैसे उरले होते. त्यामुळेच आलोक राजवाडेची अभिनेत्री प्राजक्ता माळीकडे उधारी चढली होती. अर्थात त्याने तिचे उसने घेतलेले पैसे भारतात आल्यावर लगेचच चुकते केले.

'तीन अडकून सीताराम' ची निर्मिती केली आहे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन प्रकाश वैद्य यांनी आणि प्रस्तुती केली आहे सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन ने. या चित्रपटात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे, आनंद इंगळे, विजय निकम, समीर पाटील आणि हृषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर ला प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा -

१. Film Shivarayancha Chhawa : दिग्पाल लांजेकरांच्या आगामी 'शिवरायांचा छावा' चित्रपटाची घोषणा

२. Jawan Box Office Collection Day 20 : 'जवान' चित्रपटाच्या कमाईत झाली बॉक्स ऑफिसवर घसरण...

३. Chunky Pandey Birthday : अनन्या पांडेनं 'हे' फोटो आणि व्हिडिओ शेअर करून वडील चंकी पांडेला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.