ETV Bharat / entertainment

Ileana D'Cruz : इलियाना डिक्रूझने 'डेट नाईट' फोटोसह तिच्या मिस्ट्री मॅनचा चेहरा चाहत्यांसमोर आणला.... - इलियाना तिच्या बॉयफ्रेंडसोबत

इलियाना डिक्रूझने मिस्ट्री मॅनचा चेहरा आता चाहत्यांसमोर आणला आहे. इलियानाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक कोलाज फोटो शेअर केला आहे. ज्यात मिस्ट्री मॅनचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. यापुर्वी तिने जगासमोर या मिस्ट्री मॅनचा चेहरा दाखविला नव्हता. तसेच ती लवकरच मातृत्व स्वीकार करण्यास सज्ज आहे.

Ileana DCruz
इलियाना डिक्रूझ
author img

By

Published : Jul 17, 2023, 11:16 AM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. एप्रिल महिन्यात, तिने तिच्या गर्भधारणेची घोषणा केली होती. याशिवाय तिने तिच्या होणाऱ्या मुलाच्या वडिलांबद्दल कोणतीही माहिती जगासमोर दिली नव्हती, मात्र आता तिने तिच्या होणाऱ्या मुलाच्या वडिलांचा चेहरा दाखविला आहे.

इलियानाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक कोलाज फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या होणाऱ्या मुलाच्या वडिलांचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे. या फोटोवर तिने "डेट नाईटी" लिहिलेले आहे. यासह तिने रीड-हार्ट इमोजी देखील पोस्ट केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार इलियाना ही कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टिन लॉरेंट मिशेलला डेट करत होती. मात्र आता तिने पोस्ट केल्या फोटोमध्ये सेबॅस्टियन नाही तर दुसराच एक व्यक्ती तिच्यासोबत दिसत आहे. तसेच इलियाना तिच्या पहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी तयार आहे.

इलियाना नाते टीकले नाही : इलियाना तिच्या मातृत्वाच्या प्रवासाबद्दल अनेकदा सोशल मीडियावर सांगितले आहे. याशिवाय तिने तिच्या चाहत्यांसोबत गर्भधारणेदरम्यानच्या अनेक गोष्टी शेअर केल्या आहे. यापूर्वी, इलियानाने सोशल मीडियावर तिच्या मिस्ट्री मॅनचा एक अस्पष्ट फोटो शेअर केला होता. याशिवाय तिने तिच्या चाहत्यांना बेबीमूनची झलकही दाखवली होती. यापूर्वी इलियानाने ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर अँड्र्यू नीबोनशी लग्न केले होते, मात्र यांचे नाते फार काळ टीकले नाही. हे जोडपे वेगळे झाले. इलियानाने तिचे वैयक्तिक जीवन मीडियाच्या जगापासून दूर ठेवले आहे.

फोटोमध्ये कशी दिसत आहे इलियाना : या फोटोमध्ये इलियाना आणि तिचा बॉयफ्रेड खूप आनंदी दिसत आहे. तसेच या फोटोमध्ये इलियाना लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे या तिने यावर फार कमी मेकअप केला आहे. याशिवाय तिने आपले केस मोकळे सोडले आहे. तसेच तिच्या बॉयफ्रेडने या फोटोत निळ्या रंगाचे शर्ट घातले आहे. फोटोमध्ये दोघेही फार सुंदर दिसत आहे. इलियानाने इंडस्ट्रीतील तिचा प्रवास तेलगू चित्रपटातून सुरू केला, त्यानंतर ती अनेक हिंदी चित्रपटांमध्येही दिसली. इलियानाचा पहिला हिंदी चित्रपट बर्फी होता, त्यानंतर तिने फटा पोस्टर निकला हीरो, रुस्तम, मैं तेरा हीरो, मुबारकान, बादशाहो, रेड यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

हेही वाचा :

  1. Actor Ravindra Mahajani : राजबिंडा अभिनेता रविंद्र महाजनी पंचत्वात विलीन, पुण्यात अंत्यसंस्कार
  2. Katrina Kaif Birthday : विक्की कौशलच्या भावाने कतरिना कैफला केले खास विश, म्हणाला - हॅपी बर्थडे कूलेस्ट पर्सन
  3. Atul Parchure battled with cancer : अतुल परचुरेंनी केला कॅन्सरशी मुकाबला, चुकीच्या उपचारामुळे झाला नाहक त्रास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.