ETV Bharat / entertainment

Mission Raniganj for Oscar nomination : 'मिशन राणीगंज' चित्रपट ऑस्कर नॉमिनेशनसाठी पाठवण्याचा निर्मात्यांचा निर्णय - सत्य घटनेवर आधारित मिशन राणीगंज

Mission Raniganj for Oscar nomination : अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या 'मिशन राणीगंज' संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्वतंत्रपणे 'मिशन राणीगंज' ऑस्करसाठी पाठवण्याचा निर्णय घेतलाय.

Mission Raniganj for Oscar nomination
'मिशन राणीगंज' चित्रपट ऑस्कर नॉमिनेशनसाठी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 13, 2023, 3:27 PM IST

मुंबई - Mission Raniganj for Oscar nomination : अक्षय कुमारचा अलिकडंच प्रदर्शित झालेला 'मिशन राणीगंज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी करत नसला तरी प्रेक्षकांच्या पसंतीस मात्र उतरला आहे. अनेक समीक्षकांनीही चित्रपटाचं कौतुक केलंय. इतकंच नाही तर दस्तुरखुद्द अक्षय कुमारनंही आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट असल्याचं म्हटलंय. दरम्यान, 'मिशन राणीगंज' संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्वतंत्रपणे 'मिशन राणीगंज' ऑस्करसाठी पाठवण्याचा निर्णय घेतलाय.

पूजा एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊसच्या निर्मात्यांनी 'मिशन राणीगंज' चित्रपट 10 मार्च 2024 रोजी होणाऱ्या 96 व्या अकादमी पुरस्कारांसाठी स्वतंत्रपणे पाठवला आहे. नेमकं अशाच प्रकारे 'आरआरआर' चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी केलं होतं. 'आरआरआर' चित्रपट सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट पुरस्कार श्रेणीसाठी पात्र ठरला नव्हता, मात्र यातील 'नाटू नाटू' या गाण्याला पुरस्कार मिळाला होता. 'आरआरआर' प्रमाणे मिशन राणीगंज चित्रपटही सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट पुरस्कार श्रेणीसाठी पात्र ठरणार नाही. 'मिशन राणीगंज'ला ऑस्करमध्ये कोणत्या श्रेणीत नामांकन मिळणार आहे, येणाऱ्या काळातच समजेल.

चित्रपटाबद्दल सांगायचं तर 'मिशन राणीगंज' चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. 1989 मध्ये पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे कोळसा खाणीत 71 मजूर अडकले होते. त्याचवेळी या खाणीशी संबंधित अभियंता जसवंत सिंग गिल यांनी आपला जीव धोक्यात घालून या 71 मजुरांचे प्राण वाचवले होते. अक्षय कुमारनं चित्रपटात रियल हिरो जसवंत सिंगची भूमिका साकारली आहे.

'मिशन राणीगंज' चित्रपट ६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता. याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'थँक्स फॉर कमिंग' चित्रपटाशी त्याची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. आज, 13 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जातोय. त्यानिमित्तानं 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची ऑफर देण्यात आली आहे.

'मिशन राणीगंज' चित्रपटानं आठवड्याभरात 20 कोटी रुपयांची कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटानं 3 कोटींची कमाई केली होती. रिलीजनंतर आता 8 व्या दिवशीही हा चित्रपट थिएटरमध्ये सुरू आहे. 13 ऑक्टोबरला असणारा राष्ट्रीय चित्रपट दिन आणि विकेंडला येणाऱ्या दोन सुट्ट्या यामुळे चित्रपटाच्या कमाईत भर पडेल असा विश्वास निर्मात्यांना वाटतोय.

हेही वाचा -

1. Pooja Hedge Currently Unavailable : पूजा हेडगे 'सध्या उपलब्ध नाही', पाहा तिच्या निवांत क्षणांची एक झलक

2. Vijay Varma Bags Best Actor India Award : विजय वर्मा ठरला भारताचा सर्वोत्कृष्ट अभिनेता, आशियाई अकादमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्समध्ये उठवली मोहोर

3. India V Pakistan Cricket World Cup Match : भारत पाकिस्तान क्रिकेट विश्वचषक सामन्यापूर्वी मोदी स्टेडियममध्ये परफॉर्म करणार अरिजित सिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.