ETV Bharat / entertainment

Box office day 3 : अक्षय कुमार स्टारर 'मिशन रानीगंज' आणि भूमी पेडणेकर स्टारर 'थँक यू फॉर कमिंग' रिलीजच्या तिसऱ्या किती कमाई करेल ? - मिशन राणीगंजचे कलेक्शन

Box office day 3 : अक्षय कुमार स्टारर 'मिशन रानीगंज' आणि भूमी पेडणेकर स्टारर 'थँक यू फॉर कमिंग' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी प्रदर्शित झाले. हे चित्रपट आता रिलीजच्या तिसऱ्या दिवसात आहे. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी हे चित्रपट किती कमाई करेल हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Box office day 3
बॉक्स ऑफिस दिवस 3
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 11:52 AM IST

मुंबई Box office day 3 : अक्षय कुमारचा चित्रपट 'मिशन रानीगंज द ग्रेट भारत रेस्क्यू' आणि भूमी पेडणेकर, शहनाज गिल स्टारर 'थँक यू फॉर कमिंग' चित्रपटगृहांमध्ये एकाच वेळी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाले. अक्षय कुमारचा 'मिशन राणीगंज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. तर दुसरीकडे 'थँक यू फॉर कमिंग' हा चित्रपट खूप संथ गतीनं कमाई करत आहे. 'थँक यू फॉर कमिंग'चे पहिल्या दिवशी कलेक्शन खूप कमी होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे. 'मिशन राणीगंज' जवळजवळ या चित्रपटाच्या दुप्पट कमाई करताना दिसत आहे. आता हे दोन्ही चित्रपट आपल्या रिलीजच्या तिसऱ्या दिवशात आहेत. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी हे चित्रपट किती कमाई करेल हे जाणून घेऊया....

मिशन राणीगंजचे कलेक्शन : रिपोर्टनुसार अक्षय कुमारचा 'मिशन राणीगंज' या चित्रपटानं पहिल्या दिवशी 2.8 कोटीची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 4.7 कोटीचा व्यवसाय केला. दरम्यान आता हा चित्रपट तिसऱ्या दिवशी 5.34 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 12.84 कोटी होईल. या चित्रपटाला प्रेक्षकांनी पाठिंबा दिला आहे. 'मिशन राणीगंज' हा एक बिग बजेट चित्रपट आहे. हा चित्रपट बनविण्यासाठी 120 कोटी रुपये लागले आहे. या चित्रपटाला आणखी खूप मोठ लक्ष गाठायचे आहे. सध्या चित्रपटगृहांमध्ये 'थँक यू फॉर कमिंग', 'फुकरे 3', 'चंद्रमुखी 2', 'द वैक्सीन वॉर' हे चित्रपट रूपेरी पडद्यावर आहेत, त्यामुळे 120 कोटीचं लक्ष गाठणे 'मिशन राणीगंज' चित्रपटाला अवघड जाऊ शकते.

'थँक्यू फॉर कमिंग'लाही प्रेक्षक मिळाले : 'थँक्स फॉर कमिंग'ची अवस्था खूप वाईट आहे. भूमी पेडणेकर, शहनाज गिल, डॉली सिंग, कुशा कपिला, करण कुंद्रा, अनिल कपूर आणि करण बुलानी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटानं पहिल्या दिवशी 1.06 कोटीची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 1.37 कोटीचा व्यवसाय केला. तिसऱ्या दिवशी हा चित्रपट 2.04 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 4.47 कोटीचं होईल. हा चित्रपट आता येणाऱ्या दिवशात किती कमाई करेल हे पाहणं लक्षणीय ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. Suniel Shetty on Bollywood : बॉलिवूड एकसंध राहिलं नाही, सुनील शेट्टीची खंत
  2. kangana ranaut : महादेव अ‍ॅप प्रकरणात ३४ सेलिब्रिटींना कंगना राणौतनं खडसावलं
  3. Bhumi Pednekar on male co stars : पुरुष कलाकारांसोबत काम करताना दुय्यम असल्याचं वाटतं, भूमी पेडणेकरचं विधान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.