मुंबई: हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ आणि हेली एटवेल स्टारर मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट १ हा चित्रपट या आठवड्यात खूप मंद गतीने कमाई करत आहे. क्रिस्टोफर मॅक्वेरी दिग्दर्शित या चित्रपटाचे कलेक्शन जवळपास आता ४ कोटी रुपयांवर आले आहेत. या आठवड्याचे आणखी दोन दिवस बाकी आहे. येत्या वीकेंडला हा चित्रपट चांगली कमाई करू शकतो अशी अपेक्षा केली जात आहे. सॅकनिल्क साईडच्या रिपोर्टनुसार , मिशन: इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट १ने आठव्या दिवशी सुमारे ४ कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट गेल्या बुधवारी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे एकूण कलेक्शन सध्या ७६.८५ कोटी रुपये झाले आहे.
जगभरात उत्कृष्ट कामगिरी करत आहे चित्रपट : हा सर्वात मोठ्या हॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. मिशन इम्पॉसिबल ७ हा भारतात आणि जगभरात उत्कृष्ट कामगिरी करत आहे. टॉम क्रूझने या चित्रपटात अतिशय धोकादायक स्टंट केले आहेत. या चित्रपटात खूप अॅक्शन आहे. मिशन इम्पॉसिबल ७ चित्रपटामधील व्हिज्युअल इफेक्ट्स फार उत्तम दर्जाचे असल्याने चित्रपटाची प्रशंसा करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त, हेली एटवेलचे आकर्षक अॅक्शन सीक्वेन्सही या चित्रपटामध्ये आहेत. चित्रपटामध्ये ती ग्रेस नावाच्या पिकपॉकेटची भूमिका साकारत आहे, जी अखेरीस टॉमच्या एथन हंटसोबत एकत्र येते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
मिशन इम्पॉसिबल ७ स्टार कास्ट : आता मिशन इम्पॉसिबल ७ चित्रपट १०० कोटींचा टप्पा ओलांडण्यासाठी सज्ज आहे. जगभरात हा चित्रपट जबरदस्त कलेक्शन करत आहे. या चित्रपटात सायमन पेग, हेली एटवेल, विंग रेम्स, रेबेका फर्ग्युसन आणि व्हेनेसा किर्बी यांनी देखील महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मिशन इम्पॉसिबल ७ चित्रपट निर्मित करण्यासाठी २९१ दशलक्ष लागले आहे. तसेच मिशन इम्पॉसिबल ७ने चीनमध्ये देखील खूप प्रशंसनीय कमाई केली आहे. जगभरात हा चित्रपट प्रचंड कलेक्शन करत असून येणाऱ्या काळात हा चित्रपट किती कमाई करेल यावर सर्वांच्या नजरा आहेत.
हेही वाचा :