मुंबई : 'मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट १' या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर खूप वेगाने कमाई करत आहे. या चित्रपटाने रविवारी १७ कोटी रुपयांची कमाई केली, जे आतापर्यंतचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक एक दिवसाचे कलेक्शन आहे. हा चित्रपट १२ जुलै रोजी रूपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. टॉम क्रूझ स्टारर हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिवर खूप कमालीची कामगिरी करत आहे. या चित्रपटात टॉम क्रूझ हा गुप्तहेराच्या भूमिकेत असून या चित्रपटाला प्रेक्षक खूप पसंत करत आहे.
'मिशन इम्पॉसिबल ७'ची कमाई : सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार या चित्रपटाने रविवारी भारतात सर्व भाषांमध्ये १७ कोटी रुपये कमाई केली आहे. 'मिशन इम्पॉसिबल ७' ने भारतातीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत एकूण ६३.२० कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने १२ जुलै रोजी १२.३ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने फक्त ८.७४ कोटींचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला होता. तसेच शुक्रवारी या चित्रपटाने ९.१५ कोटी रुपये कमविले होते. या वीकेंडमध्ये या चित्रपटाने चांगली भरारी घेतली. मिशन इम्पॉसिबल ७ने शनिवारी १६ कोटींची कमाई केली.
चित्रपटाची रेटिंग : हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. रॉटेन टोमॅटोवर (Rotten Tomatoes) समीक्षक आणि प्रेक्षकांनी ९६% आणि ९४% रेटिंग या चित्रपटाला दिला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ख्रिस्तोफर मॅकक्वेरी यांनी केला आहे. या चित्रपटात सायमन पेग, हेली एटवेल, विंग रेम्स, रेबेका फर्ग्युसन आणि व्हेनेसा किर्बी यांनी देखील काम केले आहे. टॉम क्रूझने या चित्रपटात एथन हंट नावाच्या गृप्तहेराची भूमिका साकरी आहे. तसेच या चित्रपटात टॉम क्रूझचे खूप धोकादायक स्टंट आहे. हा चित्रपट जगभरात खूप जास्त कमाई करत आहे. लवकरच हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर १०० कोटीचा टप्पा ओलांडणार अशी अपेक्षा केली जात आहे.
हेही वाचा :