ETV Bharat / entertainment

कतरिना आणि विजय सेतुपतीच्या मेरी ख्रिसमसचे नेटिझन्सनी केले स्वागत - Merry Chritsmas Katrina Kaif

Merry Chritsmas X review: कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांचा मेरी ख्रिसमस हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहात दाखल झाला. हा चित्रपट पाहिल्यानंतर नेटिझन्सनी एक्सवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांना चित्रपट पाहिल्यानंतर काय वाटले ते जाणून घेण्यासाठी वाचा.

Merry Chritsmas X review
मेरी ख्रिसमसचे नेटिझन्सनी केले स्वागत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2024, 4:36 PM IST

मुंबई - Merry Chritsmas X review: कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'मेरी ख्रिसमस' चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये दाखल झाला. श्रीराम राघवन दिग्दर्शित या चित्रपटाला बहुतांश सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तुम्‍ही तो पाहण्‍याची योजना करत असल्‍यास, या चित्रपटाविषयी X वर पोस्ट झालेल्या प्रतिक्रियावरुन एक नजर टाकून पाहा.

  • #MerryChristmas! I've been waiting to write this one. My favorite narrative of recent times is a beautiful love story with an amazing thriller. @VijaySethuOffl na you were pure class to watch, and the climax performance was woowwwwww. You're always an inspiration, keep inspiring… pic.twitter.com/vmgzbz2Jzq

    — atlee (@Atlee_dir) January 12, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटामध्ये 'मेरी ख्रिसमस' हे एक प्रमुख आकर्षण होते. नेटिझन्सच्या मते, या आकर्षक थ्रिलरमध्ये विजय सेतुपती आणि कतरिना कैफ यांचा उत्कृष्ट अभिनय आहे. श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शनात शेवटपर्यंत उत्तम बॅलन्स राखला आहे. त्याने कॅटरिना कैफ आणि विजय सेतुपती या असामान्य जोडीचा कथानकासाठी चांगला फायदा करुन घेतला आहे.

प्रेक्षकांनी त्याची तुलना अल्फ्रेड हिचकॉकच्या चित्रपटाशी करण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर अशा प्रतिक्रियामधून चित्रपटाच्या कथानकाचे रहस्य उलगडू शकते किंवा क्लायमॅक्सची रंगत जाऊ शकते, परंतु चाहत्यांनी याची पुरेपूर काळजी घेतल्याचं दिसत आहे. संगीतकार प्रीतम-रचित 'मेरी ख्रिसमस' ट्यूनला देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

'जवान'चा दिग्दर्शक अ‍ॅटलीने एक्सवर लिहिलंयय की, ''मेरी ख्रिसमस सारखा चित्रपट लिहिण्याची मी प्रतीक्षा करत होतो. अलीकडच्या काळातील माझी आवडती कथा ही एक अप्रतिम थ्रिलर असलेली एक सुंदर प्रेमकथा आहे. विजय सेतुपती तुमचा क्लायमॅक्सचा परफॉर्म्स कमालीचा भारी होता. तुम्ही नेहमीच प्रेरणास्थान आहात, अशा सुंदर चित्रपटांद्वारे आम्हाला प्रेरणा देत राहा. लव्ह यू. कतरिना कैफचे काम थक्क करणारे आहे. श्रीरामराघवन, सर, काय हा चित्रपट आहे! हा एक शुद्ध क्लासिक आहे, त्यावर सर्व काही लिहिले आहे तुमच्या डोईवर एक ब्लॉकबस्टर तुरा जोडा सर."

या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव करताना, एका सोशल मीडिया युजरने लिहिले: "आत्ताच 'मेरी ख्रिसमस' पाहिला आणि हा एक शानदार चित्रपट आहे, कथाकथन उत्कृष्ट आहे, विशेषतः कतरिना आणि विजयचा अभिनय शानदार आहे." मेरी ख्रिसमसला त्यानं साडेतीन तारे दिले आहेत. आणखी एका युजरने लिहिलंय, "जॉनी गद्दार, एक हसीना थी, बदलापूर आणि द अंधाधुनचे दिग्गज दिग्दर्शक श्रीराम राघवन परत आला आहे."

या भूमिकेबद्दल बोलताना कतरिनाने सांगितले की, तिच्या करिअरमधील हे सर्वात आव्हानात्मक काम आहे. तिने दावा केला आहे की, तिने पडद्यावर साकारलेल्या इतर सर्व गोष्टींच्या तुलनेत हे काम अधिक सूक्ष्म होते. त्यामुळे तिच्या चाहत्यांकडून आता जास्त अपेक्षा आहेत. 'मेरी ख्रिसमस'ला ट्विटरवर चांगल्या आणि साकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्याचं दिसतं.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

आज देशभरात प्रदर्शित झालेला हा चित्रपट 2024 मधील हिंदी चित्रपट उद्योगातील पहिल्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक असण्याची अपेक्षा आहे. बदलापूर आणि अंधाधुन या त्याच्या मागील चित्रपटांच्या लोकप्रियतेमुळे, दिग्दर्शक श्रीराम राघवन 'मेरी ख्रिसमस'सह हॅटट्रिक करेल अशी अपेक्षा आहे. या थ्रिलरचा मंजूर रन कालावधी दोन तास आणि चोवीस मिनिटे आहे आणि त्याला U/A प्रमाणपत्र मिळाले आहे.

हेही वाचा -

  1. 'गुंटूर कारम' पाहणाऱ्या महेश बाबूसह कुटुंबावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव
  2. 'अन्नपूर्णी'तील वादग्रस्त सीन प्रकरणी अभिनेत्री नयनतारासह आठ जणांविरुद्ध ठाणे जिल्ह्यात गुन्हा दाखल
  3. 'इंडियन पोलीस फोर्स'चा अनुभव सांगताना विवेक ओबेरॉय म्हणाला, "रोहित शेट्टी फिल्म इंडस्ट्रीचा विक्रम बक्षी"

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.