ETV Bharat / entertainment

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani : करण जोहरने करुन दिली रंधावा आणि चटर्जी कुंटुंबीयांची ओळख - करणने बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून आपली 25 वर्षे

रॉकीच्या भूमिकेत रणवीर सिंग आणि राणीच्या भूमिकेत आलिया भट्ट यांच्या फर्स्ट लूक पोस्टरचे अनावरण केल्यानंतर, रॉकी और रानी की प्रेम कहानीचा निर्माता करण जोहरने रंधावा आणि चॅटर्जी कुटुंबीयांचे फर्स्ट-लूक पोस्टर रिलीज केली आहेत.

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani
रंधावा आणि चटर्जी कुंटुंबीयांची ओळख
author img

By

Published : May 25, 2023, 3:45 PM IST

मुंबई - रणवीर सिंग आणि आलिया भट्टचा फर्स्ट लूक सादर केल्यानंतर, करण जोहरने त्याच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील रॉकी आणि राणीच्या कुटुंबाचे पोस्टर्स शेअर केले आहेत. स्वतःचा 51 वा वाढदिवस अधिक खास बनवण्यासाठी चाहत्यांमध्ये अधिक उत्साह निर्माण करण्यासाठी, करणने नवीन पोस्टर्स शेअर केले. पोस्टर शेअर करताना त्याने लिहिले, 'रंधावास आणि चॅटर्जी या 'कहानी'च्या दोन कुटुंबांना भेटा! कुटुंबाची शक्ती प्रेमाचे भवितव्य ठरवेल. या सर्वांचा भाग व्हा आणि रॉकी और रानी केी प्रेम कहानी 28 जुलै 2023 पासून सिनेमागृहामध्ये.'

रणवीरच्या रंधावा कुटुंबाच्या पोस्टरमध्ये जया बच्चन, धर्मेंद्र, आमिर बशीर, अंजली दिनेश आनंद आणि क्षिती जोग दिसत आहेत. यानंतर आपण आलिया उर्फ राणीच्या कुटुंबीय चटर्जींना भेटायला वळतो. आलियाशिवाय पोस्टरमध्ये शबाना आझमी, चुर्णी गांगुली, तोटा रॉय चौधरी आणि नमित दास दिसत आहेत. पोस्टर शेअर होताच, चित्रपट निर्मात्याचे चाहते आणि इंडस्ट्रीतील मित्रांनी कमेंट सेक्शनमध्ये भरपूर प्रतिक्रिया दिल्या. आलियाची आई सोनी राजदान, झोया अख्तर यांच्यासह अनेक सेलेब्रिटीजनी शुभेच्छा दिल्या. करणने इंस्टाग्रामवर रणवीरची रॉकी आणि आलियाची राणीच्या भूमिकेत ओळख करून दिली.

बुधवारी, करणने बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून आपली 25 वर्षे साजरी करण्यासाठी एक विशेष पोस्ट शेअर केली आणि त्याच्या आगामी चित्रपट, रॉकी और रानी की प्रेम कहानीच्या पहिल्या लूकबद्दलची घोषणा केली. करणने सोशल मीडियावर या खास प्रसंगी एक व्हिडिओ पोस्ट केला. 'दिग्दर्शकाच्या खुर्चीत घालवलेल्या जादुई 25 वर्षांसाठी कृतज्ञतेशिवाय काहीही नाही. मी शिकलो, मी वाढलो, मी रडलो, मी हसलो - मी जगलो. आणि उद्या, माझ्या हृदयाचा आणखी एक तुकडा तुमच्यासाठी असेलमी तुम्हा सर्वांसोबत माझा वाढदिवस साजरा करत असताना अधिक उत्साही आहे. एका कहाणीसह ज्यामध्ये प्रेम लिहिले आहे. उद्या भेटूया!', असे त्याने लिहिलंय.

व्हिडिओमध्ये, त्याने काही कुछ होता है, माय नेम इज खान, कभी खुशी कभी गम आणि स्टुडंट ऑफ द इयर सारख्या त्याच्या संस्मरणीय चित्रपटांमधील झलक शेअर केली. करण जोहरने बॉलिवूडमध्ये 25 वर्षे पूर्ण करताच अनेक बी-टाऊन सेलिब्रिटींनी आपला आनंद व्यक्त केला. 1998 मध्ये ब्लॉकबस्टर 'कुछ कुछ होता है' मधून दिग्दर्शनात पदार्पण करणारा करण सात वर्षानंतर दिग्दर्शकाच्या खुर्चीवर परतत आहे. तो 28 जुलै 2023 रोजी रॉकी और रानी की प्रेम कहानी घेऊन येणार आहे.

हेही वाचा - The Kerala Story Team : 'द केरळ स्टोरी'च्या स्टार कास्टने घेतली नितीन गडकरींची भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.