ETV Bharat / entertainment

Meera Velankar directorial debut : मीरा वेलणकरचे बटरफ्लाय चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण - बटरफ्लाय चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

अभिनेता प्रदीप वेलणकर यांची नात व मधुरा वेलणकरची मुलगी मीरा वेलणकरने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. बटरफ्लाय हा चित्रपट तिने बनवला असून याची निर्मिती अभिजित साटम, मधुरा वेलणकर साटम आणि अजित भुरे यांनी केली आहे.

Meera Velankar directorial debut
मीरा वेलणकरचे बटरफ्लाय चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण
author img

By

Published : May 19, 2023, 4:59 PM IST

मुंबई - अनेक माध्यमांतून काम करीत आता मीरा वेलणकर चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहे. बटरफ्लाय या मराठी सिनेमाच्या माध्यमातून ती दिग्दर्शन क्षेत्रात पाय ठेवत असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर समाज माध्यमांवर प्रकाशित करण्यात आले आहे. 'एका छोट्याश्या गोष्टीने आयुष्याला लखलख लाइटिंग कसं होतं ह्याची गोष्ट सांगणारा 'बटरफ्लाय,' अशी पोस्ट मीरा आणि चित्रपटाशी संबंधित कलाकारांनी सोशल मीडियावर टाकली आहे. या चित्रपटाची निर्मिती केली आहे अभिजित साटम, मधुरा वेलणकर साटम आणि अजित भुरे यांनी.

मराठी चित्रपट वास्तविकता दर्शविताना खऱ्या आयुष्याशी निगडित गोष्टी पडद्यावर मांडत असतो. आजोबा आणि आजी अनुक्रमे प्रदीप वेलणकर आणि रजनी वेलणकर तसेच आजोबा शिवाजी साटम यांचे आशीर्वाद घेत मीरा वेलणकर हिने स्वप्नांचा प्रवास उलगडणारा 'बटरफ्लाय' बनविला आहे. तिचे वडील अभिजित साटम आणि आई मधुरा वेलणकर साटम यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. दिग्गज दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर यांच्यासोबत. तसेच या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे ज्येष्ठ अभिनेते, नाट्यनिर्माते अजित भुरे यांनी.

Meera Velankar directorial debut
बटरफ्लाय चित्रपट पोस्टर

मध्यमवर्गीय गृहिणी ही चूल आणि मुलं यातच रमलेली असते असे मानले जाते. परंतु होममेकरच्या मनात देखील अनेक स्वप्ने असतात. याच स्वप्नांचा मागोवा घेणारा चित्रपट म्हणजे 'बटरफ्लाय'. गृहिणी आणि तिची स्वप्ने यांचा प्रवास या चित्रपटातून उलगडताना दिसणार आहे. आयुष्यात प्रत्येकाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. परंतु कुटुंबातील स्त्रिया शक्यतो आपल्या आशा आकांक्षा दाबून ठेवताना दिसतात. आपल्या कुटुंबासाठी झिजताना त्या आपली ओळख पूर्णपणे गमावून बसतात. बटरफ्लाय त्यांची स्वप्ने आणि ती कशी पूर्ण करता येऊ शकतात हे दर्शविणारा चित्रपट आहे.

बटरफ्लायची संकल्पना मधुरा वेलणकर यांची असून ती कथेत बंदिस्त केली आहे विभावरी देशपांडे यांनी. त्या दोघींनी पटकथा लेखन केलं असून संवाद लिहिले आहेत कल्याणी पाठारे आणि आदित्य इंगळे यांनी. वैभव जोशी आणि गुरू ठाकूर यांच्या गीतांना संगीतबद्ध केले आहे शुभाजित मुखर्जी यांनी. छायांकन केलंय वासुदेव राणे यांनी तर पार्श्वगायन केलंय वैशाली भैसने माडे आणि हंसिका अय्यर यांनी. या चित्रपटात मधुरा वेलणकर साटम, अभिजित साटम, महेश मांजरेकर, राधा धारणे, सोनिया परचुरे, प्रदीप वेलणकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

असीम एंटरटेन्मेंट आणि अॅप्रोग्रॅम स्टुडिओज ची निर्मिती असलेला 'बटरफ्लाय' येत्या २ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हेही वाचा - Rashmika Mandanna : रश्मिका मंदान्नाने पुष्पा चित्रपटातमधील श्रीवल्लीच्या भूमिकेवर ऐश्वर्या राजेशची कमेंट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.