ETV Bharat / entertainment

सिद्धार्थ आनंदने 'दोस्त' हृतिक रोशनला दिल्या ५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Siddharth Anand wishes

Hrithik Roshan birthday : हृतिक रोशनच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त 'फायटर' चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. गेली 10 वर्षे उत्तम दोस्त असलेले हे दोघे तिसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत.

hrithik roshan birthday
हृतिक रोशन 50 वा वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 1:20 PM IST

मुंबई - Hrithik Roshan birthday : हृतिक रोशन आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत असताना, त्याच्या आगामी चित्रपट 'फायटर'चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी त्याला शुभेच्छा देणारा संदेश दिला आहे. चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो शेअर करत सिद्धार्थने त्यांच्या दहा वर्षाच्या एकत्र प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

'फायटर'चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी बॉलिवूड ग्रीक गॉड हृतिक रोशनच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला संदेश देऊन सुरुवात केली. त्यांच्या आगामी चित्रपटातील दोन पडद्यामागील फोटो पोस्ट करत, सिद्धार्थने आठवणींच्या जगात फेरफटका मारला. गेली दहा वर्षे दोघे उत्तम मित्र म्हणून वावरत आले आहेत.

एका फोटोमध्ये हृतिक रोशन हवाई दलाच्या काळ्या पोशाखात दिग्दर्शक सिद्धार्थबरोबर फिरताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत दोघे 'फायटर'च्या सेटवर निर्धाराने उभे असलेले दिसत आहेत. सिद्धार्थ आनंदने गेल्या दहा वर्षातील त्याच्या मैत्रीबद्दल पोस्टमध्ये हृतिककडे कृतज्ञता व्यक्त केली आहे. तो व्यक्ती म्हणून कसा वेगळा आहे त्याचा उल्लेख करत त्याच्या दीर्घायुष्यासाठी, यश आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.

'फायटर'मध्ये हृतिक रोशन आणि सिद्धार्थ आनंद तिसऱ्यादा एकत्र काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी 'बँग बँग', आणि 'वॉर' चित्रपटात एकत्र काम केले होते. फायटरमध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

25 जानेवारी 2024 रोजी रिलीज होण्यासाठी सज्ज झालेला 'फायटर' हा चित्रपट हृतिकचा सिद्धार्थ आनंदसोबतचा केवळ तिसरा चित्रपटच नाही तर दीपिका पदुकोणसोबतची त्याची पहिली ऑन-स्क्रीन जोडी देखील आहे. 'बचना ए हसीनो' आणि 'पठाण' नंतर सिद्धार्थ आनंदसोबत दीपिका तिसऱ्यांदा एकत्र काम करत आहे.

हेही वाचा -

  1. 'बिग बॉस 17'मध्ये विक्की जैनवर नॉमिनेशननंतर भडकली मन्नारा चोप्रा
  2. हृतिक रोशन वाढदिवस : बॉलिवूडच्या ग्रीक गॉडकडे आहेत दोन अ‍ॅक्शनर्स आणि एक सुपरहिरो फ्रँचायझी चित्रपट
  3. फराह खाननं वाढदिवसानिमित्त शेअर केला एक सुंदर व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.