मुंबई - Masaba Diwali with Viv Richards : डिझायनर मसाबा गुप्ताची यंदाची दिवाळी खास बनली आहे. यावर्षीच्या दिवाळीला तिचे वडील आणि महान क्रिकेटर व्हिवियन रिचर्ड्स भारतात आले आहेत. इन्स्टाग्रामवर मसाबानं त्यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहे. यात ती वडीलांसोबत पोज देताना दिसतेय.
'माझ्यासाठी ही दिवाळी स्पेशल बनली आहे. या दिवाळीत माझ्यासोबत पापा आहेत. माझ्या जीवनात रोज प्रकाश आणणाऱ्या लोकांकडून मला भरपूर प्रेम मिळालंय. प्रत्येकाला हे नवे वर्ष चांगले जाओ, हॅप्पी दिवाळी', असं तिनं फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय.
दुसऱ्या फोटोत मसाबा पती सत्यदीप मिश्रासोबत तिच्या ऑफिसमध्ये दिवाळी पूजा करताना दिसतेय. फॅशन डिझायनर असलेल्या मसाबानं अभिनेता सत्यदीप मिश्राससोबत यावर्षी जानेवारी महिन्यात लग्न केलं होतं.
मसाबा आणि सत्यदीप मिश्रा यांच्या लग्नाला मसाबाचे वडील व्हिवियन रिचर्ड्स, आई नीना गुप्ता, सोनम कपूर, दिया मिर्झा, सोनी राझदान उपस्थित होते. मसाबाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी होण्यासाठी विवियन जानेवारी २०२३ मध्ये भारतात आले होते. मसाबाच्या लग्नात रिचर्ड्स आणि विवेक मेहरा हे दोन्ही वडील उपस्थित राहिल्यामुळे आनंद झाला होता.
आपल्या लग्नात संपूर्ण कुटुंबीय एकत्र आल्याचा आनंद मसाबानं व्यक्त केला होता. तिनं एक सुंदर एकत्रित फोटो शेअर करुन लिहिलं होतं, "पहिल्यांदाच - माझे संपूर्ण आयुष्य एकत्र आलंय. हे माझे सुंदर मिश्रित कुटुंब आहे. इथून पुढे सर्व काही फक्त बोनस आहे." या फोटोमध्ये तिचा प्रियकर सत्यदीप, सत्यदीपची आई नलिनी मिश्रा तयबजी, त्याची बहीण चिन्मय मिश्रा, नीना गुप्ता, तिचा नवरा विवेक मेहरा आणि मसाबाचे वडील विव्ह रिचर्ड्स दिसत होते.
हेही वाचा -
1. Tiger 3 X Review : दिवाळीत 'टायगर'ची गर्जना; चाहत्यांकडून समाज माध्यमांत कौतुक
3. Jr NTR dodges body double : 'वॉर 2'मध्ये बॉडी डबल न वापरता ज्युनियर एनटीआर स्वतःच करणार अॅक्शन