मुंबई - Marathi Rangbhumi Din : जागतिक स्तरावर रंगभूमी दिन 27 मार्चला साजरा केला जातो. मात्र महाराष्ट्रात 5 नोव्हेंबर या दिवशी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. 1843 मध्ये सांगली येथे मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला होता. चिंतामणराव पटवर्धन यांच्यामुळं विष्णुदास भावे यांनी 5 नोव्हेंबर 1843 साली 'सीता स्वयंवर' या नाटकाचा प्रयोग केला. तिथूनच मराठी नाटकांचा प्रारंभ झाला. मराठी रंगभूमीवर अनेक दमदार नाटकांनी गाजलेली आहे. मराठी नाटाकांमुळं अनेक कलाकारांनी नाव कमाविले आहे. आता अशा काही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहेत.
लक्ष्मीकांत बेर्डे : अभिनयासाठी ओळखले जाणारे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मुंबई मराठी साहित्य संघ या निर्मिती संस्थेमध्ये कर्मचारी म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर काही मराठी रंगभूमीवरील नाटकांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. 1983-84 मध्ये पहिल्यांदा 'टूरटूर' या मराठी रंगभूमीवरील नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली, जी हिट ठरली. या नाटकामुळं बेर्डे यांच्या विनोदी शैलीचे खूप कौतुक झाले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अत्यंत विनोदी आणि गंभीर भूमिका त्यांनी रंगमंचावर केल्या आहेत. लक्ष्मीकांत यांनी 1984 मध्ये आलेल्या 'लेक चालली सासरला' या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आणि अभिनेते महेश कोठारे यांच्यासोबत 'धूम धडाका' (1984) आणि 'दे दणदण' (1987) या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. हे दोन्ही चित्रपट प्रसिद्ध झाले.
अशोक सराफ : 250 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम करणारे अशोक सराफ हे 1969 पासून चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांनी 1969 मध्ये ‘जानकी’ या मराठी चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. यानंतर त्यांनी चिमणराव गुंड्याभाऊ, डीड शहाणे, हळदीकुंकू, 'अशी ही बनवाबनवी' आयते घरात घरोबा, बाळाचे बाप ब्रह्मचारी, भुताचा भाऊ आणि धूम धडका अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. ते 1970 आणि 1980च्या दशकामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर आणि महेश कोठारेसोबत काम करत होते. सराफ यांनी विविध मराठी नाटके आणि हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे.
प्रशांत दामले : मराठी चित्रपटातील आणि रंगभूमीवरील प्रशांत दामले यांची कारकीर्द 1983 मध्ये सुरू झाली. 'टूरटूर' या मराठी नाटकापासून दामले हे विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी 'मोरूची मावशी' या नाटकापासून रंगभूमीकडे वाटचाल सुरू केली. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये अभिनय केला आहे. त्यांनी 'चार दिवस प्रेमाचे', जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे अशा अनेक नाटकांमध्ये काम केले. याशिवाय त्यांनी 'वाजवा रे वाजवा', 'सवत माझी लाडकी', 'पसंत आहे मुलगी', 'तू तिथं मी' अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी छोट्या पडद्यावर देखील काम केलं आहे.
भरत जाधव : मराठी नाटक आणि चित्रपटांतील विनोदी भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या भरत जाधवला आज कुठल्याही ओळखीची गरज नाही. तो मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. तो मराठी चित्रपटसृष्टीत 1985 पासून सक्रिय आहे. 3000 प्रयोग करणाऱ्या 'ऑल द बेस्ट' या मराठी रंगभूमीवरील नाटकात अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर यांच्यासोबत अभिनय करताना भरत जाधव हा लोकप्रिय झाला. त्यानं 'सही रे सही' या अतिशय गाजलेल्या मराठी नाटकात काम केले. भरत जाधवला 'जत्रा' चित्रपटातील कोंबडी पळाली या गाण्यामुळं अतिशय प्रसिद्धी मिळाली. भरत जाधवनं 85 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
हेही वाचा :