हैदराबाद - टॉलिवूडमधील ज्येष्ठ दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते के. विश्वनाथ यांचे गुरुवारी (२ फेब्रुवारी) निधन झाले. दिग्दर्शक विश्च्यावनाथ यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण साउथ फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. टॉलीवुड सेलिब्रिटी चिरंजीवी, एसएस राजामौली, ब्रह्मानंदम, एमएम कीरावानी आणि कोटा श्रीनिवास राव यांच्यासह इतर दिग्गज चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते के. विश्वनाथ यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी पोहोचले होते. महान चित्रपट दिग्दर्शक के विश्वनाथ यांच्या पश्चात पत्नी कासीनाधुनी जया लक्ष्मी, रवींद्रनाथ, नागेंद्रनाथ आणि एक मुलगी पद्मावती यांच्यासह तीन मुले आहेत.
-
RIP sir
— Savita Patel (@Savita_Patel9) February 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
K Viswanath passes away#KViswanath #RIPLegend #RIP
Rest in Peace pic.twitter.com/nTylkrD75R
">RIP sir
— Savita Patel (@Savita_Patel9) February 3, 2023
K Viswanath passes away#KViswanath #RIPLegend #RIP
Rest in Peace pic.twitter.com/nTylkrD75RRIP sir
— Savita Patel (@Savita_Patel9) February 3, 2023
K Viswanath passes away#KViswanath #RIPLegend #RIP
Rest in Peace pic.twitter.com/nTylkrD75R
पवन कल्याण याने आज सकाळी दिग्दर्शक त्रिविक्रमसोबत के विश्वनाथ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना अखेरचा निरोप दिला. त्याचवेळी आरआरआरचे दिग्दर्शक एसएस राजामौली आणि संगीत दिग्दर्शक कीरावानी यांचा के. विश्वनाथ यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचणाऱ्या पहिल्या काही स्टार्समध्ये समावेश होता. याशिवाय पापाराझीने अभिनेता ब्रह्मानंदम, राजकुमार यांनाही आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.
-
K Viswanath passes away#KViswanath #RIPLegend #RIP
— Hits Talks (@RKhabr) February 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
RIP sir
Rest in Peace pic.twitter.com/0gz0Ikm42w
">K Viswanath passes away#KViswanath #RIPLegend #RIP
— Hits Talks (@RKhabr) February 3, 2023
RIP sir
Rest in Peace pic.twitter.com/0gz0Ikm42wK Viswanath passes away#KViswanath #RIPLegend #RIP
— Hits Talks (@RKhabr) February 3, 2023
RIP sir
Rest in Peace pic.twitter.com/0gz0Ikm42w
के विश्वनाथ यांचे वडिलोपार्जित घर बापटलाच्या रायपल्ले जिल्ह्यातील पेडा पुलिवरू गावात आहे. विश्वनाथ यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1930 रोजी काशिनाधुनी सुब्रह्मण्यम आणि सरस्वतम्मा यांच्या पोटी झाला. 2 फेब्रुवारी (गुरुवारी) रात्री उशिरा के. विश्वनाथ यांचे निधन झाले. 'शंकरभरणम', 'सागर संगम', 'स्वाती मुथयम' आणि 'स्वर्ण कमलम' यांसारख्या प्रतिष्ठित चित्रपटांसाठी लोकप्रिय असलेले विश्वनाथ यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.
-
K Viswanath passes away
— Hits Talks (@RKhabr) February 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Chiranjeevi Garu Paid His Last Tributes To K Viswanath Garu🙏#KViswanath #RIPLegend #RIP
RIP sir
Rest in Peace #RIPVishwanathGaru pic.twitter.com/ClrZsHSJ9r
">K Viswanath passes away
— Hits Talks (@RKhabr) February 3, 2023
Chiranjeevi Garu Paid His Last Tributes To K Viswanath Garu🙏#KViswanath #RIPLegend #RIP
RIP sir
Rest in Peace #RIPVishwanathGaru pic.twitter.com/ClrZsHSJ9rK Viswanath passes away
— Hits Talks (@RKhabr) February 3, 2023
Chiranjeevi Garu Paid His Last Tributes To K Viswanath Garu🙏#KViswanath #RIPLegend #RIP
RIP sir
Rest in Peace #RIPVishwanathGaru pic.twitter.com/ClrZsHSJ9r
असे म्हटले जाते की के. विश्वनाथ यांना वयोमानानुसार आजार होता, त्यामुळे गुरुवारी रात्री ते गंभीर आजारी पडले. त्यांना ज्युबली हिल्स येथील अपोलो रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी ते आधीच मृत झाल्याचे सांगितले.
केसीआर यांनी शोक व्यक्त केला - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी विश्वनाथ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
चित्रपट निर्माते विश्वनाथ यांनी तेलुगू सिनेमांबरोबरच तमिळ आणि हिंदीमध्येही खूप प्रसिद्धी मिळवली होती. २०१६ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1965 पासून विश्वनाथ यांनी 50 चित्रपट केले आहेत. ते तेलुगू चित्रपटसृष्टीत तसेच तमिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय राहिले.
पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले - ध्वनी कलाकार म्हणून आपला प्रवास सुरू करणाऱ्या विश्वनाथ यांनी 'शंकरभरणम', 'सागर संगम', 'स्वाती मुत्यम', 'सप्तपदी', 'कामचोर', 'संजोग' आणि 'जाग उठा इंसान' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांना पाच राष्ट्रीय पुरस्कार, 20 नंदी पुरस्कार (आंध्र प्रदेश सरकारने दिलेले) आणि जीवनगौरव यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
हेही वाचा -K Viswanath Death : ख्यातनाम तेलुगू दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे निधन