नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या रेडिओ शोच्या माध्यमातून देशाला संबोधित करत असतात. या कार्यक्रमाचे १०० भाग पूर्ण होत आहेत. या निमित्ताने प्रसार भारतीच्या वतीने एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या लोकांशी संवाद साधला अशा १०० लोकांना आमंत्रीत करण्यात आले होते. या कार्यक्रमात बॉलिवूड स्टार आमिर खान, आणि अभिनेत्री रवीना टंडन यांना बोलवण्यात आले होते. आमिर खानने यावेळी सांगितले की, पंतप्रधान करत असलेला मन की बात हा शो ऐतिहासिक आहे.
मन की बातचे आमिरने केले कौतुक - 'मन की बात या रेडिओ कार्यक्रमाचा लोकांच्यावर खूप मोठा प्रभाव पडलेला आहे. पंतप्रधानांनी ही एक ऐतिहासिक अशी गोष्ट केली आहे.', असे आमिर खान म्हणाला. येत्या ३० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात कार्यक्रमाच्या १०० वा भागात देशाला उद्देशून बोलणार आहेत. प्रसार भारतीने याचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अनेक दिग्गज लोक उपस्थित होते. आमिर खान, रवीन टंडनसह संगीतकार रिक्की केज, खेळाडू दीपा मलिक, निकहत झरीन, पाँडेचरीच्या राज्यपाल किरण बेदी उपस्थित होते.
-
#WATCH | 'Mann Ki Baat' has had a huge impact on the people of India, says Aamir Khan at "Mann Ki Baat@100" National Conclave in Delhi. pic.twitter.com/Jx7yUn7uOM
— ANI (@ANI) April 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | 'Mann Ki Baat' has had a huge impact on the people of India, says Aamir Khan at "Mann Ki Baat@100" National Conclave in Delhi. pic.twitter.com/Jx7yUn7uOM
— ANI (@ANI) April 26, 2023#WATCH | 'Mann Ki Baat' has had a huge impact on the people of India, says Aamir Khan at "Mann Ki Baat@100" National Conclave in Delhi. pic.twitter.com/Jx7yUn7uOM
— ANI (@ANI) April 26, 2023
मन की बातच्या १०० निमित्य सोहळा - मन की बातच्या १०० भागानिमित्य आयोजित कार्यक्रमाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. हा कार्यक्रम चार सत्रात पार पडणार आहे. पहिल्या सत्राचे नाव नारी शक्ती असे ठेवण्यात आले आहे. विरासत से उत्थान, जन संवाद से आत्मनिर्भरता, आव्हान से जनआंदोलन अशी तीन आणखी सत्रे पार पडतील. या कार्यक्रमात गृह मंत्री अमित शाह सहभागी होणार असून या निमित्ताने स्टँप आणि नाण्याचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय संचार मंत्री अश्विनी वैष्णव, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि वित्त राज्यमंत्री पंकज चोधरीसह अनेक नेता उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा - Dahaad Teaser : फरार सिरीयल किलरच्या मागावर सोनाक्षी सिन्हा, पाहा दहाडचा थरारक टीझर