मुंबई : पैठणीचे एक सामान्य स्वप्न पाहणाऱ्या एका असामान्य गृहिणीची कहाणी असलेल्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारांत 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा'चा बहुमान मिळवत मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. पैठणीचे एक सामान्य स्वप्न पाहणाऱ्या एका असामान्य गृहिणीची कहाणी असलेल्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारांत 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा'चा बहुमान मिळवत मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. समीक्षकांनी या चित्रपटाला पसंती दर्शवली. प्रेक्षकांनीही 'गोष्ट एका पैठणीची'वर भरभरून प्रेम केले. 2022 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाने 68व्या राष्ट्रीय पुरस्कारांत 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा'चा बहुमान मिळवला. आता हा चित्रपट आणि त्याची सुंदर कहाणी प्रेक्षकांना कालपासून प्लॅनेट मराठीच्या ओटीटी वर पाहता येत आहे. प्रेक्षकांना 'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपट व्हि. ओ. डी. म्हणजेच व्हिडिओ ऑन डिमांड पाहता येणार आहे.
'हाऊसफुल्ल'चे बोर्ड झळकले होते : प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले, प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दर्शवल्यामुळेच थिएटर बाहेर 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड झळकले होते. 'गोष्ट एका पैठणीची'मधील इंद्रायणी महिला प्रेक्षकांना आपल्यातीलच एक वाटली. घराघरातील ही कहाणी अनेकांना भावली. ज्यांचे इंद्रायणीला भेटायचे राहून गेले त्यांना आता 'गोष्ट एका पैठणीची’ प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे. अभिनेत्री सायली संजीव म्हणाली, चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मला अनेक चांगल्या प्रतिक्रिया आल्या. माझ्या व्यक्तिरेखेत स्वतःला शोधल्याचे अनेकींनी सांगितले. माझ्यासाठी हा क्षण खूप मौल्यवान होता. आता 'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपट माझ्या वाढदिवसाच्या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही सर्वात सुंदर भेट आहे. ज्यांना हा चित्रपट पाहता आला नाही त्यांना आता ओटीटीवर पाहता येणार आहे.
प्रमुख भूमिका : मंत्रा व्हिजन प्रस्तुत, गोल्डन रेशो फिल्म्स, प्लॅनेट मराठी, लेकसाइड प्रॉडक्शन निर्मित 'गोष्ट एका पैठणीची'चे अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता निर्माते असून अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती-विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन शंतनू रोडे यांचे आहे. सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक- गोडबोले, अदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
'मन कस्तुरी रे'ने प्रेक्षकांचे मन जिंकले : नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'मन कस्तुरी रे' या चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकले. प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या वेगवेगळी असते. प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धतही निराळी असते. मात्र या सगळ्यात संवाद महत्वाचा असतो. जर एकमेकांसोबत संवादच झाला नाही की त्याचे रूपांतर गैरसमजात होते आणि त्यानंतर काय होते हे आपल्याला संकेत माने दिग्दर्शित 'मन कस्तुरी रे' या चित्रपटात पाहायला मिळते. अभिनय बेर्डे, तेजस्वी प्रकाश यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे.
चित्रपटामध्ये भरपूर सस्पेन्स आणि ट्विस्ट पाहायला मिळत असून एकमेकांसाठीचा द्वेष, सूड भावनाही आहे. नितीन केणी यांच्या नेतृत्वाखाली, मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, व्यंकट अत्तिली, मृत्यूंजय किचंबरे यांच्या इमेन्स डायमेंशन एन्टरटेनमेंट ॲण्ड आर्ट्स निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते ड्रॅगन वॅाटर फिल्म्सचे निशीता केणी आणि करण कोंडे आहेत.