ETV Bharat / entertainment

MAMI Film Festival 2023: मामी फिल्म फेस्टिव्हलमधील प्रियंका चोप्राचा रेड कार्पेट लूक पाहून निक जोनास झाला थक्क - मामी फिल्म फेस्टिव्हल 2023 ला सुरुवात

मुंबई अकादमी ऑफ मूव्हिंग इमेज (MAMI) चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा भारतात आली आहे. शुभ्र पांढऱ्या गाऊनसह तिनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं. तिच्या या फोटोवर पती निक जोनासनंही प्रतिक्रिया दिली आहे.

MAMI Film Festival 2023
मामी फिल्म फेस्टिव्हलमधील प्रियंका चोप्रा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 11:26 AM IST

मुंबई - ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रानं शुक्रवारी मुंबईत सुरू झालेल्या 'जिओ मामी' मुंबई फिल्म फेस्टिव्हल 2023 ला उपस्थित राहून महोत्सवाच्या ग्लॅमरमध्ये भर टाकली. यावेळी तिनं शुभ्र पांढरा गाऊन परिधान केल्यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती. सुंदर मेकअपसह तिनं आपले केस एका स्लीक बनमध्ये बांधले होते. प्रियांकानं तिचा लूक मॅचिंग व्हाईट लाँग कोट आणि किमान दागिन्यांसह पूर्ण केला. प्रियांकानं तिच्या इंस्टाग्रामवर गाला नाईटच्या लूकची एक स्ट्रिंग शेअर केली आहे. यामध्ये तिनं जिओ मामी फिल्म फेस्टिव्हलच्या ओपनिंग नाईटला हजर असल्याचं सांगितलंय.

शुक्रवारी मामीच्या ओपनिंग नाईटसाठी प्रियांकाने लेबनीज-इटालियन फॅशन डिझायनर टोनी वॉर्डची निर्मिती निवडली. हॉल्टर नेक असलेल्या पांढऱ्या आणि सोनेरी ट्वायलाइट एम्ब्रॉयडरी पोशाखात ती अतिशय सुंदर दिसत होती. शुद्ध पांढऱ्या तफेटा केपने प्रियांकाच्या रेड कार्पेट लूकमध्ये तिनं सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या होत्या. तिचा हा लूक पाहून तिचा नवरा निक जोनास देखील थक्क झाला. त्यानं प्रियंकाच्या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. प्रियांकाने पोस्ट केलेल्या एका फोटोत ती काळ्या ग्रँड पियानोच्या शेजारी पोज देताना दिसली आणि तिचा पती निक जोनासने पोस्टवर फायर इमोजी टाकत डॅम म्हटलंय. यावेळी ती भारतात निक जोनास शिवाय आली आहे. तिच्यासोबत त्यांची मुलगी मालती मेरी भारतात आली आहे.

प्रियांका चोप्राचे मामी फिल्म फेस्टीव्हलमधील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फिल्म फेस्टिव्हलला हजर राहण्यासाठी प्रियांका शुक्रवारी पहाटे मुंबईत दाखल झाली. दहा दिवस सुरू राहणाऱ्या मामी महोत्सवाला 27 ऑक्टोबरला सुरूवात झाली. 5 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या चित्रपट महोत्सवात जगभरातील 250 हून अधिक उत्तम चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. हा फेस्टिव्हल मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील जिओ वर्ल्ड सेंटर, कन्व्हेन्शन, थिएटर आणि कॉन्सर्ट हॉल कॉम्प्लेक्स येथे होणार आहे.

MAMI Film Festival 2023
प्रियंका चोप्राचा रेड कार्पेट लूक पाहून निक जोनास झाला थक्क

या फिल्म फेस्टीव्हलच्या ओपनिंग नाईटसाठी बॉलिवूडच्या अनेक तारे तारकांनी हजेरी लावली यामध्ये करीना कपूर खान, राजकुमार राव, सनी लिओन, सोनम कपूर, सैफ अली खान, विजय वर्मा आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्यासह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या उपस्थितीने सुरुवातीच्या रात्रीची शोभा वाढवली.

हेही वाचा -

  1. Mami Festival 2023 : प्रियांका चोप्रा, राजकुमार राव, सोनम कपूरसह सेलेब्रीटींच्या मांदियाळीनं 'मामी'ची चमक वाढवली

2. Saif Ali Khan : सैफ अली खानच्या घरी पोहोचले मुंबई पोलीस, काय आहे कारण?

3. Allu Arjun Wish For David Warner : अल्लु अर्जुननं डेव्हिड वॉर्नरला दिल्या 'पुष्पा' स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.