कोच्ची : मल्याळम चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक सिद्धीकी इस्माईल यांचे कोच्ची येथे मंगळवारी रात्री साडेसातच्या दरम्यान घडली. सिद्धीकी इस्माईल यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे कोची येथील खासगी रुग्णालयात निधन झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. त्यांच्या निधनाने मल्याळम चित्रपटसृष्टीतील महत्वाचा तारा निखळला. सिद्धीकी इस्माईल यांनी 'बॉडीगार्ड' या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. त्यामुळे त्यांचा बॉलिवूडमध्येही चांगलाच दबदबा होता.
सिद्दीकी यांचे पार्थिव कडवंथरा येथील राजीव गांधी इनडोअर स्टेडियममध्ये आज सकाळी 9 ते 11:30 पर्यंत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनतर त्यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. आज संध्याकाळी सिद्दीकी यांच्या पार्थिवावर ६ वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती चित्रपट दिग्दर्शक बी. उन्नीकृष्णन यांनी दिली.
-
Noted Malayalam filmmaker Siddique passes away, condolences pour in
— ANI Digital (@ani_digital) August 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/2ydph7X7F9#Siddique #dies #Malayalamfilmmaker pic.twitter.com/iNYaumU8ky
">Noted Malayalam filmmaker Siddique passes away, condolences pour in
— ANI Digital (@ani_digital) August 8, 2023
Read @ANI Story | https://t.co/2ydph7X7F9#Siddique #dies #Malayalamfilmmaker pic.twitter.com/iNYaumU8kyNoted Malayalam filmmaker Siddique passes away, condolences pour in
— ANI Digital (@ani_digital) August 8, 2023
Read @ANI Story | https://t.co/2ydph7X7F9#Siddique #dies #Malayalamfilmmaker pic.twitter.com/iNYaumU8ky
सिद्धीकी इस्माईल यांचा प्रवास : सिद्धीकी ईस्माईल यांचा जन्म कोची येथे 1 ऑगस्ट 1960 ला झाला होता. त्यांनी शिक्षण कलामासरी येथील सेंट पॉल महाविद्यालयातून पूर्ण केले होते. शिक्षणानंतर आता पुढे काय, असा सवाल त्यांच्यापुढे असताना सिद्धीकी यांनी मिमिक्री आर्टीस्ट म्हणून कोचीन कला भवन येथे काम सुरू केले. येथेच काम करताना त्यांना असिस्टंट डायरेक्टर म्हणून मल्याळम चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. सिद्धीकी यांचे लग्न सजिथा यांच्यासोबत झाले. त्यांना सोमय्या, सारा आणि सुकून या तीन मुली आहेत. सिद्धीकी ईस्माईल यांनी 1989 मध्ये रामजी राव स्पिकींग या चित्रपटातून आपल्या चित्रपट दिग्दर्शनाला सुरुवात केली होती. तर बीग ब्रदर हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला आहे.
बॉडीगार्डने दिली वेगळी ओळख: सिद्धीकी इस्माईल यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सिद्धीकी ईस्माईल यांचा बॉडीगार्ड हा चित्रपट मल्याळम भाषेत प्रचंड गाजल्यानंतर त्याचा रिमेक हिंदीत करण्याचे सिद्धीकी ईस्माईल यांनी ठरवले. त्यामुळे बॉडीगार्ड हा त्यांचा एकमेव हिंदी चित्रपट ठरला. या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई करत 'हायेस्ट ओपनींग डे ग्रॉसर ऑफ हिंदी सिनेमा'चा विक्रम बॉडीगार्डच्या नावावर नोंदवला गेला. त्यानंतर एकाच आठवड्यात 103 कोटींची कमाई करणारा हा पहिलाच बॉलिवूडचा चित्रपट ठरला. 60 कोटीचे बजेट असलेल्या या चित्रपटाने तब्बल 252 कोटींची कमाई केली. विशेष म्हणजे अभिनेता सलमान खानला या चित्रपटाने चांगलाच हात दिला. सलमान खानच्या करिअरला या चित्रपटाने भरघोस कमाई करत तारल्याचे दिसून आले.