ETV Bharat / entertainment

नवविवाहित नयनतारा, विघ्नेश शिवनला भेटली मलायका अरोरा - Nayantara & Vignesh Shivan Wedding

अभिनेत्री मलायका अरोरा हिने मुंबईत नवविवाहित नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांची भेट घेतली. या नव्या दांपत्यासोबतचे फोटो तिने शेअर केले आहेत.

नवविवाहित नयनतारा, विघ्नेश शिवन
नवविवाहित नयनतारा, विघ्नेश शिवन
author img

By

Published : Jul 11, 2022, 11:05 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने मुंबईत नवविवाहित नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांची भेट घेतली. इन्स्टाग्राम स्टोरीवर मलायकाने नयनतारा आणि विघ्नेशसोबत एक सुंदर फोटो शेअर केला आहे. फोटोत मलायका मुंबई शहरातील नवीन मिस्टर आणि मिसेसच्या शेजारी उभी असलेली दिसत आहे.

मलायका कॅमफ्लाज सॅटिन ड्रेसमध्ये स्टायलिश दिसत आहे, तर नयनताराने ब्लॅक टँक टॉप आणि ऑलिव्ह ग्रीन पँटमध्ये उबेर कूल व्हाइब्स दिले आहेत. नयनताराच्या पतीने चॉकलेटी शर्ट आणि जीन्सची परिधान केली आहे. "अभिनंदन नयनतारा आणि विघ्नेश.. तुम्हा दोघांना भेटून खूप आनंद झाला," असे मलायकाने पोस्टला कॅप्शन दिले आहे.

नवविवाहित नयनतारा, विघ्नेश शिवन
नवविवाहित नयनतारा, विघ्नेश शिवन

काही वर्षे डेटिंग केल्यानंतर नयनतारा आणि विघ्नेश यांनी यावर्षी 9 जून रोजी महाबलीपुरममधील एका खासगी रिसॉर्टमध्ये लग्न केले होते. या सोहळ्याला जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. मोजक्याच सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले होते. रजनीकांत, शाहरुख खान आणि दिग्दर्शक ऍटली हे काही सेलिब्रिटी लग्नात दिसले होते.

लग्न झाल्यापासून हे जोडपे अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांच्या आकर्षक फोटोंसह अपडेट करताना दिसतात. त्यांनी अलीकडेच त्यांच्या हनीमूनसाठी थायलंडची सहल केली होती. नयनतारा आणि विघ्नेश यांनी 'नानुम राउडीधन' मध्ये एकत्र काम केल्यावर डेटिंग करण्यास सुरुवात केली. विजय सेतुपती यांचीही भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता.

हेही वाचा - युरोपमध्ये मजा मस्ती करुन मुंबईत परतला कार्तिक आर्यन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.