ETV Bharat / entertainment

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीनं केला ब्रेकअपचा खुलासा, जाणून घ्या कारण - अभिनेता अरबाज खान

Arbaaz khan and Giorgia andriani breakup : जॉर्जिया एंड्रियानीनं अभिनेता अरबाज खानसोबत झालेल्या ब्रेकअपवर खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जॉर्जियानं ब्रेकअपच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Arbaaz khan and Giorgia andriani breakup
अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानीचं ब्रेकअप
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 13, 2023, 4:50 PM IST

मुंबई - Arbaaz khan and Giorgia andriani breakup : अभिनेत्री मलायका अरोरा, अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानी हे पुन्हा एकदा त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आले आहेत. मलायका अरोरापासून वेगळे झाल्यानंतर अरबाज खान परदेशी मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत होता. अरबाज आणि जॉर्जिया यांनी बराच काळ एकत्रित घालवलेला आहे. दरम्यान त्याचं नुकतेच ब्रेकअप झाल्याचं समजत आहे. अरबाज खानचं जॉर्जियासोबत कोणामुळं ब्रेकअप झालं, यावर सध्या चर्चा सुरू आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जॉर्जिया एंड्रियानीनं अरबाज खानपासून वेगळे होण्याचे कारण सांगितलं आहे.

अरबाज खान आणि जॉर्जियाचं ब्रेकअप : मुलाखती दरम्यान जॉर्जियानं अरबाजसोबतच्या ब्रेकअपच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तिनं अरबाज खानसोबतच्या ब्रेकअपमध्ये मलायका अरोराची कोणतीही भूमिका नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. जॉर्जियानं खुलासा करत म्हटलं की, ''माझ्या आणि अरबाजमध्ये विभक्त होण्यामागे छोटी-छोटी कारणे आहेत. पुढं तिनं सांगितलं की, 'मी एक खेळकर व्यक्ती आहे आणि मोकळेपणाने जगण्यावर विश्वास ठेवते, मला बाहेर जाणे आणि प्रवास करणे आवडते, तर अरबाजला घरी बसून चित्रपट पाहणं आवडतं. मी घरी बसू शकत नाही, मी मोकळेपणाने जगण्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे, आमचे विचार जुळत नाहीत, मी मुक्तपणे जगणारी व्यक्ती आहे आणि मला ते गमावायचे नाही, अरबाज एक चांगला व्यक्ती आहे, मी अजूनही त्याच्यावर प्रेम करते''.

मलायका आणि अरबाजचा घटस्फोट : मलायका आणि अरबाज 1998 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते. लग्नाच्या 18 वर्षानंतर, त्यांनी मार्च 2016 मध्ये त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली. मे 2017 मध्ये त्यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला. हे जोडपे अरहान खान या मुलाचे पालक आहेत. विभक्त होऊनही, दोघेही आपल्या मुलाची काळजी आणि जबाबदारी घेत आहेत. बऱ्याचं वेळा मलायका आणि अरबाज हे आपल्या मुलासोबत विमातळावर दिसतात. अनेकदा या जोडप्याचे व्हिडिओ अरहान खानसोबत व्हायरल होतात. सध्या अरहान हा परदेशात शिकत आहे.

हेही वाचा :

  1. तृप्ती डिमरीचे विकी कौशलसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
  2. 'फायटर'मधील अक्षय ओबेरॉयचा फर्स्ट लूक रिलीज, स्क्वाड्रन लीडर बशीर खानची साकारतोय भूमिका
  3. बार्सिलोना फुटबॉल सामन्यादरम्यान डिस्प्लेवर झळकले 'अ‍ॅनिमल'चे पोस्टर्स

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.