ETV Bharat / entertainment

Dream Girl 2 Teaser : 'ड्रीम गर्ल २' चा दिलखेचक टीझर रिलीज, ट्रेलरची प्रतीक्षा सुरू - नवीन पोस्टर रिलीज

आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे अभिनीत आगामी कॉमेडी-ड्रामा चित्रपट 'ड्रीम गर्ल २'चा टीझर आज प्रदर्शित झाला आहे. या धमाल टीझरमुळे चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढली असून चित्रपटाच्या उद्या येणाऱ्या ट्रेलरची व रिलीजची प्रतीक्षा सुरू झाली आहे.

Dream Girl 2 Teaser
ड्रीम गर्ल २चा टिझर
author img

By

Published : Jul 31, 2023, 2:55 PM IST

मुंबई : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर 'ड्रीम गर्ल २' चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर अखेर रिलीज झाला आहे. आशिकों, मी परत आलो आहे, असे म्हणत आयुष्मान खुरानाने टीझर त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ड्रीम गर्ल २ चा ट्रेलर उद्या रिलीज होणार असल्याचेही त्याने चांहत्यांना कळवले आहे. या चित्रपटामध्ये आयुष्मान हा पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसविण्यासाठी रूपेरी पडद्यावर दाखल होत आहे. 'ड्रीम गर्ल २' चित्रपटाच्या नवीन टीझरमध्ये आयुष्मान हा आपल्या हटके अंदाजात दिसत आहे. तर निर्मात्यांनी अनन्या पांडेचा 'ड्रीम गर्ल २' मधील फर्स्ट लुक रिलीज करून चाहत्यांना एक सुंदर भेट दिली आहे. २०१९मध्ये आलेला 'ड्रीम गर्ल' या चित्रपटाने चाहत्यांच्या मनाला हळूवार स्पर्श केला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आणि त्यात पूजा बनलेल्या आयुष्मान खुरानाने चाहत्यांची मने जिंकली होती. आता प्रेक्षक 'ड्रीम गर्ल २' या चित्रपटाची वाट आतुरतेने पाहत आहेत. आयुष्मान खुरानाने 'ड्रीम गर्ल २' च्या माध्यमातून प्रेक्षकांना त्याची पहिली झलक दाखवली आहे.

चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी निवडला एक अनोखा मार्ग : आयुष्मान खुरानाचा 'ड्रीम गर्ल २' हा चित्रपट गेल्या वर्षभरापासून चर्चेत होता. सध्या हा चित्रपट रिलीजच्या तयारीत आहे. दरम्यान निर्मात्यांनी 'ड्रीम गर्ल २'चे प्रमोशन करण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला आहे. गेल्या वर्षभरापासून पूजा नावाची मुलगी तिच्या प्रियकराला भेटण्याचे आश्वासन देत होती, मात्र आजपर्यत ती कोणाला दिसली नाही. पुजाच्या प्रियकरांच्या यादीत शाहरुख सलमान आणि रणवीर सिंगपर्यंत अनेक सुपरस्टार्स आहेत.

आयुष्मानने 'ड्रीम गर्ल २'बद्दल दिली माहिती : 'ड्रीम गर्ल २' बद्दलचा हा सस्पेन्स प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. पूजाचा सुंदर आवाज ऐकू आला, पण चेहरा आजवर दिसत नाही. मात्र, आता प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे कारण काही तासांनंतर 'ड्रीम गर्ल २' चा टीझर प्रदर्शित होणार आहे, त्यासोबतच पूजा आता सर्वांना दिसणार आहे. पूजाला पाहण्यासाठी अनेकजण आतुर आहेत.

'ड्रीम गर्ल २' चा मुख्य अभिनेता आयुष्मान खुरानाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे अपडेट शेअर केले आहे. त्याने टीझर-ट्रेलर रिलीज अपडेटसह 'ड्रीम गर्ल २' ची नवीन पोस्ट जारी केली आहे. यात त्याने सांगितले की, टीझर आज म्हणजेच ३१ जुलैला रिलीज होईल आणि ट्रेलर उद्या म्हणजेच १ ऑगस्टला रिलीज होणार आहे. 'ड्रीम गर्ल २' हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Box Office Collection : 'ओपनहाइमर' 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ला मागे टाकत 'बार्बी' चित्रपटाने रोवला यशाचा झेंडा...
  2. Kiara Advani Birthday : कियारा अडवाणी पती सिद्धार्थसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली परदेशी...
  3. Zinda Banda Song : 'जवान'मधील 'जिंदा बंदा' गाणे प्रदर्शित, भव्य सेटवर शाहरुख खानचा जबरा डान्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.