ETV Bharat / entertainment

Mahesh Babu And Sitara : महेश बाबूला मिळाली प्रेमाने भरलेली मीठी... - प्रेमाने भरलेली मीठी दिली

साऊथ सुपरस्टार महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्मये हेश बाबू हा मुलगी सिताराला मीठी मारताना दिसत आहे.

Mahesh Babu And Sitara
महेश बाबू आणि सितारा
author img

By

Published : Jul 12, 2023, 4:58 PM IST

मुंबई : साऊथ सुपरस्टार महेश बाबू नेहमी आपल्या कुटुंबाबद्दल बोलत असतो. कुटुंबावरील प्रेमामुळे तो वारंवार चर्चेत देखील येत असतो. महेश बाबूला गौतम आणि सितारा घट्टमनेनी नावाची दोन मुले आहेत. तसेच अनेकदा महेश बाबू हा पत्नी नम्रता शिरोडकर कौतुक देखील करत असतो. महेश बाबूची मुलगी सितारा ही नेहमीच चर्चेत असते. अनेकदा ती तिचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. ती फार चांगली नृत्यांगना आहे. ती सोशल मीडियावर फार सक्रिय असते. दरम्यान आता सितारा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सितारा ही वडील महेश बाबूला मिठी मारताना एका फोटोमध्ये दिसत आहे.

नम्रता शिरोडकर केला शेअर फोटो : नम्रता शिरोडकरने सोशल मीडियावर तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर महेश बाबू आणि मुलगी सितारा हिचा एक फोटो पोस्ट केला, ज्यात ती वडील महेश बाबूला मीठी मारत आहे. या फोटोत पावसाळ्यात दोघे सकाळी चांगला वेळ घालवताना दिसत आहेत. हा मनमोहक क्षण नम्रताने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. फोटो शेअर करताना नम्रताने लिहिले की, 'सकाळी मिठी मारणे आणि शाळेत जाणे (तीन हृदयाच्या डोळ्यांच्या इमोजीसह).' पुढे तिने लिहले 'हे सर्व प्रेमाबद्दल आहे (रेड हार्ट इमोजी). महेश बाबू हा साऊथ इंडस्ट्रीमधील टॉपचा अभिनेता असून त्याला आपल्या मुलांसोबत वेळ घालवणे आवडते. अनेकदा महेश बाबू आपल्या कुटुंबासह दुसऱ्या देशात सुट्ट्यामध्ये जात असतो.

वर्क फ्रंट : दरम्यान, महेश बाबूच्या वर्क फ्रंटवर, बोलायचे झाले तर तो सध्या त्रिविक्रम श्रीनिवास दिग्दर्शित 'गुंटूर करम' या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. एका दशकानंतर या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने महेश बाबूबरोबर काम केले आहे. त्यांनी यापूर्वी 'अथाडू' आणि 'खलीजा' सारख्या हिट चित्रपटात एकत्र काम केले होते. अनेक अडथळ्यांनंतर या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू झाले आहे. हा चित्रपट पुढील वर्षी संक्रांतीच्या मुहूर्तावर १२ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची वाट प्रेक्षक फार आतुरतेने पाहत आहेत.

हेही वाचा :

  1. Jawan Prevue : शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाच्या प्रीव्ह्यूवर सलमान खानने दिली प्रतिक्रिया...
  2. Satyaprem Ki Katha box office collection: 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाने १३व्या दिवशी केली 'इतकी' कमाई...
  3. Mouni Roy : मौनी रॉय मुंबई विमानतळावर एंट्री गेटवर गोंधळली...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.