मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता आणि महाभारत या गाजलेल्या मालिकेतील शकुनीमामाची भूमिका साकारलेले गुफी पेंटल यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी पेंटल यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांचा मुलगा हॅरी पेंटलने त्यांच्या निधनाची बातमी दिली. हॅरी पेंटलने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात लिहिलंय की, 'आम्ही आमचे वडील श्री गुफी पेंटल यांच्या दुःखद निधनाची घोषणा करत आहोत. आज सकाळी त्यांचे कुटुंबीयांच्या समवेत असताना शांततेत निधन झाले'.
प्रसिद्ध अभिनेते गुफी पेंटल यांचे आज पहाटे निधन झाल्याने मनोरंजन क्षेत्रातील आणखी एक मोठी हानी झाली. महाभारतातील शकुनी मामाच्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे, गुफी पेंटल हे तब्येतीच्या समस्येने त्रस्त होते आणि त्यांचे कुटुंबीयांच्या उपस्थितीत निधन झाले. महाभारतातील शकुनी मामा उर्फ गुफी पेंटल यांना तब्येतीचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होते. अखेर त्यांची मृत्यशी झुंज संपली आहे.
रंगमंचापासून सुरू झालेल्या गुफी पेंटल यांचा वावर चित्रपट आणि टीव्ही मालिकातून होता. ते केवळ अभिनयातच न अडकता त्यांनी त्यांनी दूरचित्रवाणी दिग्दर्शक म्हणूनही काम केले. रफू चक्कर, देस परदेस, दिल्लगी, मैदान-ए-जंग, दावा यासारख्या अनेक लोकप्रिय बॉलीवूड चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.
ठोच्या पडद्यावर शकुनीमामा ही व्यक्तीरेखा अजरामर करणाऱ्या पेंटल यांनी ओम नमः शिवाय, मिसेस कौशिक की पांच बहुयँ, अकबर बिरबल, कानून, सौदा, जय कन्हैया लाल की या टीव्ही मालिकातूनही काम केले. महाभारतमधील शकुनीमामाच्या भूमिकेने सर्वाधिक लोकप्रियता मिळाली व ते देशाच्या घराघरात पोहोचले होते.
हेही वाचा -
१, Sulochana Latkar : लता मंगेशकर ते बिग बीने समर्थन देऊनही सुलोचना दीदींची 'ती' इच्छा राहिली अपूर्ण