मुंबई - Madhuri Dixit : सध्या अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या आगामी 'पंचक' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 5 जानेवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती माधुरीनं पती श्रीराम नेने यांच्यासह केली आहे. आता 'पंचक' रिलीज होण्यापूर्वी माधुरीनं 2 जानेवारी रोजी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. माधुरी शेवटची 2022 मध्ये 'माझा मा' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता. आनंद तिवारी दिग्दर्शित आणि सुमित बठेजा लिखित, हा चित्रपट एक कौटुंबिक मनोरंजन करणारा होता.

माधुरी दीक्षितचा घेतलं सिद्धिविनायकांचं दर्शन : दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये माधुरी आणि तिचे कुटुंब पारंपरिक वेषभूषेत दिसत आहे. याशिवाय ती यावेळी तिच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. तिनं शेवटी 'गणपती बाप्पा मोरया' चा जयजयकार केला. अलीकडेच माधुरीला 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' इफ्फीमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. हा विशेष सन्मान मिळाल्यावर माधुरी म्हटलं होतं, ''हा पुरस्कार मिळाल्यानं मला खूप आनंद होत आहे. अशा प्रकारचे पुरस्कार मिळाल्यानंतर चांगलं काम करण्याचं प्रोत्साहन मिळतं आणि हे सम्मान प्रेरणा देखील देतात.''


'पंचक' चित्रपटाची स्टार कास्ट : 'पंचक' चित्रपटाच्या यशासाठी माधुरीनं बाप्पाचा आशीर्वाद घेतला आहे. माधुरी दीक्षितची एक झलक पाहण्यासाठी सिद्धिविनायक मंदिर परिसरात चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. माधुरी दीक्षितच्या 'पंचक' चित्रपटासाठी आता अनेकजण उत्सुकता आहेत. माधुरी सध्या 'पंचक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे, भारती आचरेकर, सतीश आळेकर, आनंद इंगळे, आरती वडगबाळकर, विद्याधर जोशी, तेजश्री प्रधान, संपदा कुलकर्णी, नंदिता धुरी सागर शोध, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, गणेश मयेकर आणि दिलीप प्रभावळकर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
हेही वाचा :