ETV Bharat / entertainment

राजू श्रीवास्तव प्रमाणेच जिममध्ये ह्रदयविकाराचा झटका आलेले फिटनेस फ्रिक सेलेब्रिटी

जिममध्ये वर्कआऊट करताना राजू श्रीवास्तवला ह्रदयविकाराचा झटका आला. तो ट्रेडमिलवरून पडल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारलाही जिममध्ये असा त्रास झाला व त्यातच त्याचे निधन झाले होते. याआधी बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर कैझाद कपाडिया यांचेही हृदयविकाराने निधन झाले. फिटनेस फ्रिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिध्दार्थ शुक्लालाही आपला जीव गमवावा लागला होता. आज आपण अशा फिटनेस फ्रिक सेलेब्रिटींना आलेल्या ह्रदयविकाराबद्दल जाणून घेऊयात.

ह्रदयविकाराचा झटका आलेले फिटनेस फ्रिक सेलेब्रिटी

author img

By

Published : Aug 10, 2022, 4:32 PM IST

हैदराबाद - टीव्ही आणि चित्रपट जगतातील प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. राजू यांना राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिममध्ये वर्कआऊट करताना राजूला ह्रदयविकाराचा झटका आला. तो ट्रेडमिलवरून पडल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अलीकडेच अशाच प्रकारे अनेक सिनेक्षेत्रातील व क्रिडाक्षेत्रातील सेलेब्रिटींना ह्रदयविकाराचा समाना करावा लागला होता. फिटनेस प्रेमी असलेल्या राजू श्रीवास्तव यांना जसा जिममध्ये ह्रदयविकाराचा झटका आला तसाच त्रास भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीलाही झाला होता. सदैवाने यातून गांगुली पूर्ण बरे झाले आहेत.

राजू श्रीवास्तव
राजू श्रीवास्तव

२ जानेवारी २०२१ रोजी सकाळी घरी जिममध्ये काही काळ घालवल्यानंतर गांगुलीला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होता. गांगुलीला ‘कार्डियक अरेस्ट’ सौम्य झटका बसल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

सौरभ गांगुली
सौरभ गांगुली

पुनीत राजकुमारलाही जिममध्ये हृदयविकाराचा झटका - प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे २९ ऑक्टोबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या वृत्तानंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुनीत राजकुमारला सकाळी साडेअकरा वाजता जिममध्ये हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला तातडीने बंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. अलीकडेच अशाच प्रकारे बॉलिवूडचा तरुण अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचाही लहान वयात हृदयविकाराने मृत्यू झाला.

पुनीत राजकुमार
पुनीत राजकुमार

फिटनेस फ्रिक सिद्धार्थ शुक्लाचे निधन- बिग बॉस आणि बालिका वधू फेम सिद्धार्थ शुक्लाचं हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ४० व्या वर्षी २०२१ मध्ये निधन झाले. सिद्धार्थ शुक्ला त्याच्या अप्रतिम शरीरयष्टीबद्दल प्रसिद्ध होता. फिटनेस फ्रिक म्हणून तो ओळखला जायचा. त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या सर्वांना तो फिटनेस बाबत जागरूक करीत असे आणि शरीरावर मेहनत करण्यासाठी उद्युक्त करीत असे. बिग बॉसमध्ये तो खूप रागीट असल्याचे दिसले होते. परंतु खऱ्या जीवनात तो अत्यंत मृदुभाषी होता आणि आपल्या विनोदबुद्धीने सर्वांना हसवत ठेवायचा.

फिटनेस फ्रिक सिद्धार्थ शुक्ला
फिटनेस फ्रिक सिद्धार्थ शुक्ला

सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर कैझाद कपाडिया यांचेही हृदयविकाराने निधन - सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आणि टायगर श्रॉफचे मार्गदर्शक कैजाद कपाडिया यांचे यांचे १४ ऑक्टोबर २०२१ रोजी हृदयविकारामुळे निधन झाले. टायगरच्या फिटनेस जडणघडणीत कैजाद यांचा मोठा वाटा होता. मुंबईतील के ११ अकॅडमी ऑफ फिटनेस सायन्सेसचे कैजाद कपाडिया हे मालक होते. त्यांच्या फिटनेस सेंटरवर शरीरसौष्ठवासोबतच चपळतेचे, साहसाचे, संतुलित आहाराचे घडे दिले जायचे. याचा मोठा लाभ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्यांना होत आला आहे. त्यामुळे त्यांच्या जिममध्ये मेहनत करणाऱ्या सर्वांनाच त्यांच्या निधनाने धक्का बसला.

टायगर श्रॉफचे मार्गदर्शक कैजाद कपाडिया
टायगर श्रॉफचे मार्गदर्शक कैजाद कपाडिया

हेही वाचा - ''मी जर कुणाचे मन दुखावले असेल तर मला त्या गोष्टीबद्दल वाईट वाटते'' आमिर खान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.