मुंबई - बॉलिवूड अभिनेता बोमन इराणी इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान आणि अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने गेल्या काही वर्षांत चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लाखो हृदयांना मोहित केले आहे.
अध्यापनाच्या असामान्य पद्धतीचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या प्राध्यापकाची व्यक्तिरेखा असो किंवा डॉक्टर जे.सी. अस्थाना, बोमनने प्रत्येक भूमिका चोख बजावली आहे. अभिनेता आज 63 वर्षांचा होत असताना, त्याने पडद्यावर साकारलेल्या 5 संस्मरणीय भूमिकांवर एक नजर टाकूया.
थ्री इडियट्समधील विरु शहस्त्रबुद्धे उर्फ व्हायरस - 2009 मध्ये आलेल्या या हिंदी कॉमेडी-ड्रामा चित्रपटातील बोमनच्या अभिनयाचे सर्वसामान्यांनी खूप कौतुक केले. कालबाह्य अध्यापन तंत्राचे पालन करणाऱ्या महाविद्यालयाच्या संचालकाची भूमिका त्यांनी केली. त्याच्या व्यक्तिरेखेमध्ये सुरुवातीला खूप नकारात्मक रंग होते, परंतु चित्रपटाच्या क्लायमॅक्सपर्यंत, तो अखेरीस स्वतःमध्ये सुधारणा करतो.
डीसीपी डिसिल्वा आणि वर्धन 'डॉन' फ्रँचायझीमध्ये - फरहान अख्तर दिग्दर्शित 'डॉन' आणि 'डॉन 2' मध्ये बोमनची बहुमुखी प्रतिभा स्पष्टपणे दिसून आली होती. ज्या प्रकारे त्याने दोन भिन्न पात्रे साकारली होती ती कमाल होती. प्रथमतः डीसीपी डिसिल्वा, एक मुखवटा घातलेला पोलीस अधिकारी आणि नंतर वर्धन, एक धोकादायक गुन्हेगार त्याने लीलया साकारला होता.
'मुन्ना भाई' फ्रँचायझीमधील डॉ. अस्थाना आणि लकी सिंग - जरी दोघेही पूर्णपणे भिन्न पात्र असले तरी, अभिनेता अनुक्रमे 'मुन्ना भाई M.B.B.S' आणि 'लगे रहो मुन्ना भाई' मध्ये डॉ अस्थाना आणि लकी सिंग या व्यक्तीरेखामध्येही तितकाच चमकला. पूर्वीची भूमिका करत असताना, कठीण परिस्थितीत हसण्याची त्याची सवय आणि नंतरचा एक धूर्त तरीही संरक्षणात्मक वडील म्हणून त्यांनी केलेले चित्रण, चित्रपटांमध्ये त्यांचे एक स्वतःचे स्थान होते.
'खोसला का घोसला'मध्ये खुराना - या चित्रपटात बोमनने खुरानाची भूमिका साकारली होती, जो दिल्लीतील एका व्यावसायिकाशी खेळ करतो. प्रेक्षकांना अभिनेत्याची ही क्षुद्र आणि विनोदी आवृत्ती पाहणे आवडले होते, अशी भूमिका दुसरे कोणीही साकारु सकले नसते.
'जॉली एलएलबी'मध्ये राजपालचे वकील - बोमनने एका हुशार वकिलाची भूमिका केली आहे जो आवश्यक त्या मार्गाने प्रत्येक केस जिंकण्याचा प्रयत्न करतो. एका धूर्त वकिलाच्या भूमिकेत तो इतका खरा आणि उग्र होता की त्याच्या आणि न्यायाधीशाची भूमिका करणारे सौरभ शुक्ला यांच्यातील न्यायालयीन वाद चित्रपटात वास्तवाचे दर्शन देणारा ठरला.
हेही वाचा - उर्फी म्हणाली सनी लिओनीला, 'तू माझ्या ड्रेसशी स्पर्धा नाही करु शकत'