ETV Bharat / entertainment

Leo Movie : थलपथी विजयच्या 'लिओ'चं वाजत गाजत स्वागत; थिएटर बाहेरचा व्हिडिओ व्हायरल... - लिओ चित्रपट

Leo Movie : थलपथी विजयचा 'लिओ' हा चित्रपट आज चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला. या चित्रपटासाठी अनेकजण खूप उत्सुक होते. दरम्यान सकाळी चाहत्यांनी या चित्रपटाचं वाजत गाजत स्वागत केलंय, त्यानंतर आता काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताहेत.

Leo Movie
लिओ चित्रपट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 4:43 PM IST

मुंबई - Leo Movie : थलपथी विजयचा 'लिओ' हा बहुप्रतीक्षित चित्रपट आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, विजयचा चित्रपट प्रदर्शित झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी, अनेक चाहत्यांनी पहाटेपासूनच जल्लोष सुरू केला. सध्या काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये थलपथी विजयचे चाहते नाचताना आणि जल्लोष करताना दिसत आहेत. दक्षिण भारतात अनेक ठिकाणी बॅण्ड वाजवून उत्साहात चित्रपटगृहांमध्ये चाहत्यांनी गर्दी केली. हा चित्रपट 'जवान' आणि पठाणचं रेकॉर्ड ब्रेक करेल असं सध्या दिसत आहे.

थिएटरच्या बाहेर वाजला बॅण्ड : तिरुअनंतपुरममधील श्री पद्मनाभ थिएटरच्या बाहेर 'लिओ'च्या रिलीजचा आनंद साजरा करताना चाहत्यांनी वाजत गाजत चित्रपटाचं स्वागत केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे. लोकेश कनागराज दिग्दर्शित 'लिओ'मध्ये संजय दत्त, त्रिशा कृष्णन आणि अर्जुन सर्जा यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये संजय दत्तनं खलनायकाची भूमिका साकारली आहे. अलीकडेच सुपरस्टार रजनीकांतनं थलपथी विजयला 'लिओ'साठी शुभेच्छा दिल्या होत्या. 'लिओ' या चित्रपटाबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं होत, 'मी देवाला प्रार्थना करतो की हा चित्रपट खूप हिट व्हावा.'

'लिओ'ने आगाऊ बुकिंगमध्ये 'जवान'चा विक्रम मोडला : चाहते थलपथी विजय आणि दिग्दर्शक लोकेश कनागराज यांच्या 'लिओ'ची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज तो दिवस आला आहे. 'लिओ' देशभरात अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 'लिओ'बद्दल चाहत्यांमध्ये किती उत्साह आहे याचा अंदाज बंपर अ‍ॅडव्हान्स बुकिंगनं लावता येईल. आगाऊ बुकिंगच्या बाबतीत 2023 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'जवान'लाही या चित्रपटानं मागं टाकलं आहे. यासोबतच 'लिओ'नं 2023 च्या ओपनिंग डे साठी सर्वाधिक अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा विक्रमही केला आहे.

हेही वाचा :

  1. Raj Kundra : 'यूटी69'चा ट्रेलर रिलीजनंतर राज कुंद्रा पहिल्यांदाच विमानतळावर मास्कशिवाय दिसला; पहा व्हिडिओ...
  2. Naal 2 Bhingori song out : 'नाळ 2'मधील मनाचा ठाव घेणारं ‘भिंगोरी’ गाणं प्रदर्शित; पहा व्हिडिओ...
  3. Bigg Boss 17 : तहलका भाईची पत्नी दीपिका आर्याचा राडा, व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.