ETV Bharat / entertainment

स्क्विड गेम सिझन 3 मध्ये सामील होण्यासाठी लिओ डिकॅप्रिओला मिळू शकते आमंत्रण

हॉलिवूड स्टार लिओनार्डो डिकॅप्रियोला ( Leonardo DiCaprio ) स्क्विड गेमच्या ( Squid Game ) सिझन ३ मधील कलाकारांमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले जाऊ शकते, असे मालिकेचे लेखक दिग्दर्शक ह्वांग डोंग ह्युक यांनी म्हटले आहे.

लिओ डिकॅप्रिओला मिळू शकते आमंत्रण
लिओ डिकॅप्रिओला मिळू शकते आमंत्रण
author img

By

Published : Sep 17, 2022, 10:14 AM IST

लॉस एंजेलिस - नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय मालिका स्क्विड गेमच्या ( Squid Game ) दुसऱ्या सिझनची चर्चा गेली वर्षभर सुरू आहे. मालिकेच्या पहिल्या सिझनला जगभर प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ही मालिका आजवरची सर्वात जास्त पाहिली गेलेली जागतिक मालिका आहे. आता दुसऱ्या सिझनची उत्कंठा वाढीस लागली असताना तिसऱ्या सिझनचीही शक्यता स्पष्ट झाली आहे. यासाठी हॉलिवूड स्टार लिओनार्डो डिकॅप्रियोला ( Leonardo DiCaprio ) 'स्क्विड गेम'च्या कलाकारांमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले जाऊ शकते, असे मालिकेचे लेखक-दिग्दर्शक ह्वांग डोंग-ह्युक ( Hwang Dong-hyuk ) यांनी म्हटले आहे.

शुक्रवारी सेऊलमध्ये एका अभिनंदन पत्रकार परिषदेत, स्क्विड गेम सीझन २ मध्ये हॉलीवूडचा कोणी ज्ञात अभिनेता काम करेल का, असे विचारले असता, ह्वांग म्हणाले, "सीझन 2 मध्ये हॉलीवूडचा कोणताही ज्ञात अभिनेता दिसणार नाही. तसे ठरलेले नाही मात्र बदल झाल्यास तिसऱ्या सिझनमध्ये तसे होऊ शखते, परंतु दुसरा सिझन कोरियाच्या पार्श्वभूमीवरच पार पडेल. लिओनार्डो डिकॅप्रियोने यांनी म्हटलंय की तो स्क्विड गेमचा मोठी फॅन आहे, त्यामुळे आम्ही त्याला या गेममध्ये भाग घेण्यासाठी विचारु शकतो."

'स्क्विड गेम'चा दुसरा सिझनबद्दल बोलताना ह्वांगने सांगितले की, "आम्ही सीझन 2 चे शूटिंग पुढच्या वर्षी २०२३ मध्ये सुरू करू आणि २०२४ मध्ये ते रिलीज होईल," असे मालिकेचे लेखक-दिग्दर्शक म्हणाले. ते पुढे म्हणाले की आगामी हंगामात प्रॉडक्शन बजेटमध्ये सुधारणा दिसून येईल आणि सिझनमध्ये खेळल्या जाणार्‍या खेळांची पुष्टी झाली आहे.

'स्क्विड गेम' टीमच्या सेलिब्रेटरी प्रेस मीटमध्ये, मुख्य अभिनेता विजेता ली जंग-जे उपस्थित नव्हता. तो टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी त्याने दिग्दर्शित केलेल्या 'द हंट'च्या उत्तर अमेरिकन प्रीमियरसाठी रवाना झाला होता.

गोल्डन ग्लोब्स आणि स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड अवॉर्ड्स व्यतिरिक्त, 'स्क्विड गेम्स' ने 14 एम्मी पुरस्कार नामांकन मिळवले आणि सहा ऐतिहासिक विजय मिळवले आहेत.

'स्क्विड गेम' टीमने ड्रामा मालिकेतील उत्कृष्ट मुख्य अभिनेत्यासाठी (ली), एक नाट्यमय मालिकेसाठी उत्कृष्ट दिग्दर्शन (ह्वांग), ड्रामा मालिकेतील उत्कृष्ट पाहुणी अभिनेत्री (ली यू-मी), उत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइनसाठी वर्णनात्मक समकालीन कार्यक्रम, उत्कृष्ट स्टंट कामगिरी आणि एका एपिसोडसाठी सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स असे सहा पुरस्कार मिळाले आहेत.

हेही वाचा - बायकॉट बॉलिवूडची खिल्ली उडवत ड्रीम गर्ल २ च्या रिलीज तारखेची घोषणा पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.