ETV Bharat / entertainment

Leo Box Office Collection Day 6: थलापथी विजय स्टारर 'लिओ'नं बॉक्स ऑफिसवर मारली बाजी; रिलीजच्या सहाव्या दिवशी करेल इतकी कमाई... - एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन

Leo Box Office Collection Day 6: साऊथचा सुपरस्टार विजय थलापथीचा 'लिओ' हा चित्रपट 19 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. याशिवाय टाइगर श्रॉफचा 'गणपथ' हा फ्लॉप झाला आहे.

Leo Box Office Collection Day 6
लिओ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 6
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 12:15 PM IST

Updated : Oct 24, 2023, 1:22 PM IST

मुंबई - Leo Box Office Collection Day 6 : थलपथी विजय स्टारर 'लिओ' बॉक्स ऑफिसवर सध्या वादळ निर्माण करतोय. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 19 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी जगभरात 100 कोटींचा टप्पा पार केलाय. अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. हा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी होतेय. लोकेश कनगराज दिग्दर्शित हा चित्रपट रोजच बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडत आहे. पहिल्या दिवसापासून तर आत्तापर्यंत 'लिओ'चं जोरदार कलेक्शन सुरू आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'लिओ'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं पहिल्या दिवशी 'लिओ'नं 64.8 कोटीची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 35.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 39.66 कोटी, चौथ्या दिवशी 41.55 कोटी, पाचव्या दिवशी 35.19 कोटीचा व्यवसाय केला आहे. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 216.45 कोटी झालं आहे. आता हा चित्रपट रिलीजच्या सहाव्या दिवसात आहे. रिलीजच्या सहाव्या दिवशी हा चित्रपट 28 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 244.45 होईल. हा चित्रपट जगभरात खूप जलद गतीनं कमाई करत आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत थलपती विजयच्या 'लिओ'चा समावेश झाला आहे.

'लिओ' चित्रपटाबद्दल : यासोबतच 'लिओ'च्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, रिपोर्टनुसार, जगभरातील एकूण कलेक्शन हे 450 कोटीहून अधिक झाले आहे. या चित्रपटामध्ये विजयनं अनेक अ‍ॅक्शन दिले आहे. याशिवाय या चित्रपटामध्ये विजय व्यतिरिक्त संजय दत्त, त्रिशा कृष्णन, सुर्या, अर्जुन दास, अर्जुन सर्जा, मायस्किन, गौतम वासुदेव मेनन, मन्सूर अली खान, प्रिया आनंद आणि सँडी हे कलाकार आहेत. या चित्रपटामध्ये संजय दत्त हा खलनायकाच्या भूमिकेत आहे. विजयचा हा चित्रपट 250-300 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. सेव्हन स्क्रीन स्टुडिओची निर्मित 'लिओ'चे डिजिटल अधिकार नेटफ्लिक्सकडे आहेत. म्हणजेच चित्रपटगृहांनंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. टाइगर श्रॉफ स्टारर 'गणपथ' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे.

'गणपथ'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

पहिला दिवस 2.5 कोटी

दुसरा दिवस 2.25 कोटी

तिसरा दिवस 2.25 कोटी

चौथा दिवस 1.49 कोटी

पाचवा दिवस 1.59 कोटी * कमावू शकतो

एकूण 10.08 कोटी

हेही वाचा :

  1. Bigg Boss 17 : वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस'मध्ये स्पर्धकांच्या आयुष्यातील रहस्ये येणार समोर...
  2. Urfi Javed Bandra Police Station Video : उर्फी जावेदचा वांद्रे पोलिस स्टेशनमधील व्हिडिओ झाला व्हायरल; पहा व्हिडिओ...
  3. Bigg boss 10 : 'बिग बॉस कन्नड'च्या 10व्या सीझनमधील स्पर्धक वरथूर संतोषला झाली अटक ; जाणून घ्या काय आहे प्रकरण...
Last Updated : Oct 24, 2023, 1:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.