मुंबई - Leo Box Office Collection Day 4: विजय थलपथीचा 'लिओ' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 19 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. चार दिवसांत 'लिओ'नं अनेक चित्रपटाने रेकॉर्ड मोडले आहेत. 'लिओ' नं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर अवघ्या दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला होता. चार दिवसांत या चित्रपटाचे कलेक्शन 200 कोटींच्या जवळपास पोहोचले आहे. हा चित्रपट रिलीज होण्याआधीच खूप चर्चेत आहे. दिग्दर्शक लोकेश कनकराज आणि सुपरस्टार विजय यांची जोडी यावेळीही आपली जादू रुपेरी पडद्यावर दाखवत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'लिओ'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन : सकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, 'लिओ'नं पहिल्या दिवशी 64.8 कोटीची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 35.25 कोटींची कमाई केली होती, तर तिसऱ्या दिवशी 39.66 कोटीचा व्यवसाय केला होता. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 139.85 कोटी झाले होते. हा चित्रपट आता रिलीजच्या चौथ्या दिवसात आहे. रिलीजच्या चौथ्या दिवशी हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 40 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं देशांतर्गत एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 179.85 होईल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड झपाट्यानं कमाई करत आहे. लवकरच 'लिओ' हा 'जवान' चित्रपटाला कमाईच्याबाबत पछाडणार आहे, असं सध्या दिसत आहे.
'लिओ' बॉक्स ऑफिस कलेक्शन
- एक दिवस 64.8 कोटी
- दोन दिवस 35.25 कोटी
- तीन दिवस 39.66 कोटी
- चार दिवस 40 कोटी
- एकूण 179.71 कोटी
'लिओ' झळकले हे कलाकार : दिग्दर्शक लोकेश कनागराज दिग्दर्शित ‘लिओ’ हा अॅक्शन-पॅक्ड चित्रपट आहे. चाहते खूप दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक भरभरून 'लिओ'वर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. विजयसोबतच संजय दत्त आणि त्रिशा कृष्णनही ‘लिओ’मध्ये मुख्य भूमिकेत दिसले होते. संजय दत्तनं या चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये खूप कमाई करत आहे.
हेही वाचा :
- Happy Birthday Parineeti Chopra: प्रियांका चोप्रासह चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकांरानी परिणीतीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...
- Anil Kapoor: मिस्टर इंडियाचा दुसरा भाग येणार? अनिल कपूरची पोस्ट झाली व्हायरल...
- Mandali Censor Board : ट्रेलर मंजूर करण्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल 'मंडली' निर्मात्यांकडून सेन्सॉर बोर्डावर टीका