ETV Bharat / entertainment

Leke Prabhu Ka Naam teaser: अरिजित सिंगच्या गाण्यावर सलमान आणि कतरिनाच्या केमिस्ट्रीची जबरदस्त झलक - टायगर 3

Leke Prabhu Ka Naam teaser: अरिजित सिंगनं गायलेलं सलमान खानच्या 'टायगर 3' चित्रपटातील 'लेके प्रभू का नाम' हे पहिलंच गाणं 23 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. गाणं रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर 'लेके प्रभु का नाम' गाण्याची झलक शेअर केलीय.

Leke Prabhu Ka Naam teaser
सलमान आणि कतरिनाच्या केमिस्ट्रीची जबरदस्त झलक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2023, 3:18 PM IST

Updated : Oct 20, 2023, 3:57 PM IST

मुंबई - Leke Prabhu Ka Naam teaser: सुपरस्टार सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या भूमिका असलेल्या 'टायगर 3' या बहुप्रतिक्षित चित्रपटातील पहिल्या गाण्याची झलक निर्मात्यांनी शेअर केली आहे. या चित्रपटातील 'लेके प्रभु का नाम' नावाचा हा ट्रॅक एक भरपूर एनर्जी असलेली पार्टी असणार आहे. अरिजित सिंगनं पहिल्यांदाच सलमानसाठी गायलेल्या या गाण्याची यामुळे प्रचंड उत्कंठा निर्माण झालीय.

सलमान खान आणि अरिजित सिंग यांच्यात गेल्या सात वर्षापासून जमत नव्हतं. यापूर्वी 'सुल्तान' चित्रपटातील अरिजितनं गाणं काढून टाकण्यात आलं होतं. हे गाणं निर्मात्यांनी काढलं होता आणि त्या निर्णयाशी आपल्या संबंध नव्हता असं स्पष्टीकरण नंतर सलमाननं दिलं होतं. अखेर 'टायगर 3' मध्ये अरिजित सिंगनं गाणं गायलं आहे आणि येत्या 23 ऑक्टोबर रोजी ते रिलीज केलं जाणार आहे. यापूर्वी गाण्याची एक झलक चित्रपट आणि गाण्याबद्दलचा उत्साह वाढवत आहे.

'लेके प्रभू का नाम' गाण्याच्या पहिल्या टिझरमध्ये सलमान आणि कतरिनाच्या ग्लॅमरस अवतारांची झलक दाखवण्यात आली आहे. यामध्ये त्यांची झगमगणारी ऑन स्क्रिन केमिस्ट्री आणि एनर्जिटिक डान्स मूव्ह्स ट्यूनवर सेट करण्यात आल्या आहेत. 'लेके प्रभू का नाम'ला संगीत प्रीतम यांनी दिलंय. अमिताभ भट्टाचार्य यांनी रचलेल्या या गाण्याला अरिजित सिंग आणि निखिता गांधी यांनी स्वरसाज चढवला आहे.

'लेके प्रभू का नाम' गाण्याची झलक पाहून चाहत्यांचा उत्साह दुणावला आहे. यूट्यूबवर शेअर झालेल्या या टिझरला लोकांना सकारात्मक प्रतिसाद द्यायला सुरुवात केलीय. सलमान आणि अरिजित सिंग यांचा डबल तडका यात पाहायला मिळणार असल्याच्या भावना चाहते व्यक्त करतायत.

'यशराज फिल्म्स'च्या 'स्पाय युनिव्हर्स' मालिकेतला 'टायगर 3' हा पाचवा भाग आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मनिष शर्मानं केलंय. यात सलमान आणि कतरिना यांनी टायगर आणि झोया या आपापल्या व्यक्तिरेखा पुन्हा साकारल्या आहेत. तर 'टायगर 3' च्या ट्रेलरने इमरान हाश्मीची क्रूर खलनायक अशी ओळख करुन दिली आहे. 'टायगर 3' च्या ॲक्शन पॅक्ड ट्रेलरनं आधीच हवा निर्माण केलीय. हा चित्रपट यंदाच्या दिवाळीला 12 नोव्हेंबर रोजी त्याच्या थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा -

  1. Rajinikanth Wishes Ganapath : रजनीकांतनं 'गणपथ'च्या टीमला दिल्या शुभेच्छा, जॅकी श्रॉफनंही मानलं थलैयवाचं आभार

2. Priyanka Chopra: मिस वर्ल्ड २००० प्रियांकासोबत कोण आहे ही मुलगी? ...बिग बॉस 17 साठी दिल्या शुभेच्छा

3. Shilpa Shettys Husband Raj Kundra : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने केला 'विभक्त' झाल्याचा खळबळजनक खुलासा

Last Updated : Oct 20, 2023, 3:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.