ETV Bharat / entertainment

'मैं अटल हूं'  चित्रपटातील देशभक्तीपर "देश पेहले" हे गाणं लॉन्च - Main Atal Hoon Release Date

Desh Parhe song launch from Main Atal Hoon : दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 99 व्या जयंती निमित्त देशात वेगवेगळे उपक्रम पार पडत आहे. त्यांच्या जीवनावर 'मैं अटल हूं' हा चित्रपटातील येत असून यातील "देश पेहले" हे गाणं आज लॉन्च करण्यात आलं.

Desh Parhe song launch from Main Atal Hoon
"देश पेहले" हे गाणं लॉन्च
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 25, 2023, 4:58 PM IST

मुंबई - Desh Parhe song launch from Main Atal Hoon : देशप्रेमाच्या भावनेला भावपूर्ण साद घालणारं विनोद भानुशाली प्रस्तुत, 'मैं अटल हूं' या चित्रपटातील "देश पेहले" हे गाणं आज लॉन्च करण्यात आलं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्तानं हे खास गाणं चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या भेटीस आणलं आहे. रवी जाधव दिग्दर्शित 'मैं अटल हूं' या चित्रपटात पंकज त्रिपाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट 19 जानेवारी 2024 रोजी देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओज प्रोडक्शन, विनोद भानुशाली, संदीप सिंग आणि कमलेश भानुशाली यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

पंकज त्रिपाठी यांनी गाण्याची झलक दाखवणारी एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, "दुनिया के सारे सुख पिछे, देश पहले.''

आज दिल पे हात रखके यह कसम ले हम सभी

ना झुकेगा देश अपना ना झुकेंगे हम कभी

असे बोल असलेलं हे सुंदर चालीतील गाणं अटल बिहारींचे संघर्षमय जीवनाचं दर्शन घडवतं. त्यांच्या आयुष्यात आलेले अनेक खडतर प्रसंग या गाण्यातून आपल्या समोर उलगडत जातात. पायल देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत मनोज मुंतशीर यांनी लिहिलं आहे. जुबीन नौटियाल यांनी या गाण्याला आपला स्वरसाज दिला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

आगामी 'मैं अटल हूं' या चित्रपटावर बऱ्याच दिवसांपासून काम सुरू होते. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून त्याचे पोस्ट प्रॉडक्शन सध्या सुरू आहे. याबाबतची माहिती पंकज त्रिपाठी आणि चित्रपट निर्मात्यांनी दिली आहे. तसेच या चित्रपटामधील व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये पंकज हा अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत शूटिंग करताना दिसत आहेत. या लूकमध्ये तो फार वेगळा दिसत आहे. या लूकमध्ये त्याला ओळखणे फार कठीण आहे. या चित्रपटात पंकज हा आपल्या वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'मैं अटल हूं' या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले असून चित्रपटाचे लेखन ऋषी विरमानी यांनी केले आहे. या चित्रपटाच्या लखनऊ शूट दरम्यान, चित्रपट निर्मात्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आणि चित्रपटाबाबत खूप चर्चा केली होती. या चित्रपटात अटलबिहारी वाजपेयीबाबत अनेक नव्या गोष्टी रूपेरी पडद्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ४५ दिवसांत पूर्ण झाला आहे. या चित्रपटाची शूटिंग मुंबई, दिल्ली, कानपूर आणि लखनऊ याठिकाणी झाली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचे बालपण आणि राजकीय प्रवास: या चित्रपटात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे बालपण आणि राजकीय प्रवासबद्दल दाखवले जाणार आहे.

हेही वाचा -

  1. अरबाज खानच्या लग्नात सलमान खानचा नवविवाहित वधू आणि अरहान खानसोबत डान्स
  2. प्रभास आणि प्रशांत नीलच्या 'सालार'चा पहिल्या तीन दिवसात 200 कोटी क्लबमध्ये प्रवेश
  3. 'सालार' वादळापुढे 'डंकी'ची चिवट झुंज, पहिल्या विकेंडची कमाई 100 कोटी पार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.