ETV Bharat / entertainment

Kushi BO Collection Day 2: विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू स्टारर 'खुशी'ने केली बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई.... - एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन

Kushi BO Collection Day 2: विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू स्टारर तेलुगू रोमँटिक ड्रामा 'खुशी' हा चित्रपट प्रचंड कमाई करत आहे. शिव निर्वाण दिग्दर्शित हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Kushi BO Collection Day 2
खुशी बॉक्स ऑफिस कलेक्शन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 6:27 PM IST

मुंबई - Kushi BO Collection Day 2: विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू यांचा रोमँटिक चित्रपट 'खुशी' 1 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक सकारात्मक प्रतिसाद देत आहे. या चित्रपटामधील विजय आणि सामंथाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये विजय आणि सामंथा व्यतिरिक्त सचिन खेडेकर, मुरली शर्मा, सरण्या पोंवानन आणि लक्ष्मी हे कलाकार आहेत. हा चित्रपट रूपेरी पडद्यावर लवकरच 40 कोटीची टप्पा ओलांडेल असे दिसत आहे. 'खुशी' हा चित्रपट रिलीजच्या तिसऱ्या दिवशी किती कमाई करू शकतो, चला जाणून घेऊया....

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'खुशी' चित्रपटाचे एकूण कलेक्शन : 'खुशी'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी देशांतर्गत 15.25 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर या चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 9.90 कोटींचा व्यवसाय केला आहे. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 25.15 कोटी झाले आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, हा चित्रपट आज म्हणजेच तिसऱ्या दिवशी रविवारी 10.00 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 35.15 कोटी होईल. खुशी' चित्रपटाची कहानी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण चित्रपगृहांमध्ये गर्दी करत आहे. यापूर्वी विजय आणि सामंथा हे 'महंती'मध्ये एकत्र दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता.

सामंथा आणि विजय ऑन-स्क्रीन केमिस्ट्री : आता पुन्हा एकदा सामंथा आणि विजय 'खुशी'मध्ये एकत्र आले आहेत. या चित्रपटातील सर्व गाणी प्रेक्षकांना आवडत आहेत. शिव निर्वाण दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट 30 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचे संगीत हेशम अब्दुल वहाबने दिले आहे. 'खुशी' चित्रपटाची कहाणी विप्लव (विजय) आणि आराध्याच्या (सामंथा) नात्याभोवती फिरते. दरम्यान आता 'खुशी' चित्रपटाची एक क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विजय देवरकोंडा बेडरूममध्ये सामंथासोबत रोमँटिक होताना दिसत आहे. या नव्या ऑन-स्क्रीन कपलने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

हेही वाचा :

Jawan advance booking: शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटना प्रदर्शित होण्यापूर्वीच केली कोट्यवधींची कमाई, जाणून घ्या आकडेवारी

Kartik Aaryan hugged His Ex Sara Ali Khan: 'गदर 2'च्या पार्टीत कार्तिकनं एक्स गर्लफ्रेंड साराला मारली मिठी , व्हिडिओ व्हायरल

Rakhi Sawant files case : राखी सावंतने मैत्रिणीविरोधात केली मानहानीची तक्रार दाखल....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.