मुंबई - Kushi Box Office Collection Day 1: 'खुशी' चित्रपटाची चर्चा बऱ्याच दिवसापासून सुरू होती. काल हा चित्रपट रूपेरी पडद्यावर रिलीज झाला. चाहत्यांना सामंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडाची जोडी खूप आवडत आहे. यापूर्वी दोघेही 'महंती'मध्ये एकत्र दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. आता या चित्रपटाच्या यशानंतर सामंथा आणि विजय पुन्हा एकदा 'खुशी'मध्ये एकत्र आले आहेत. खुशी' चित्रपटातील प्रेमकहानी प्रेक्षकांना खूप पसंत पडत आहे. दरम्यान आता या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 'खुशी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे जाणून घेऊया...
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'खुशी'चे कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'खुशी'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 16 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशीच जबरदस्त कमाई केली. 'खुशी'चे या आठवड्याच्या शेवटी कलेक्शन वाढू शकते. सामंथा आणि विजयचा हा चित्रपट तेलुगू आणि तमिळमध्ये रिलीज झालाय. 'खुशी'चा तेलुगू आवृत्तीचा एकूण व्याप 59.13 टक्के होता, तर तमिळ आवृत्तीमध्ये 40.12 टक्के व्याप नोंदवला आहे. शिव निर्वाण दिग्दर्शित आणि मायथ्री मूव्ही मेकर्स निर्मित, या चित्रपटामध्ये जयराम, सचिन खेडेकर, मुरली शर्मा, लक्ष्मी, अली, रोहिणी, वेनेला किशोर, राहुल रामकृष्ण, श्रीकांत अय्यंगार आणि सरन्या हे कलाकर आहेत. हा चित्रपट या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असा अंदाज बांधला जात आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'खुशी' चित्रपटाची कहाणी : 'खुशी'बद्दल बोलायचे झाले तर ही कहाणी विप्लव आणि आराध्याची आहे, जे काश्मीरमध्ये सुट्टी घालवण्यासाठी तिथं जातात. या ठिकाणी दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यानंतर दोघांचे कुटुंब त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न करतात, मात्र हे जोडपे त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न करतात. त्यानंतर लग्नाच्या काही दिवसानंतर या जोडप्यामध्ये मतभेद निर्माण होऊ लागतात. अशी या चित्रपटाची कहाणी आहे. हा चित्रपट हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेत डब करण्यात आला आहे. या चित्रपटाचे संगीत हेशम अब्दुल वहाबने दिले आहे. दरम्यान सध्या सामंथाने अभिनयातून ब्रेक घेतला आहे. नुकतीच ती बालीमध्ये सुट्टी घालविण्यासाठी गेली होती. त्यानंतर तिने भारतात येऊन 'खुशी'चे प्रमोशन केले. 'खुशी'च्या म्युझिकल कॉन्सर्टमध्ये विजय आणि सामंथा यांनी रोमँटिक डान्स केला होता.
हेही वाचा :