ETV Bharat / entertainment

kriti sanon at siddhivinayak : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकल्यानंतर क्रिती सेनॉन पोहोचली सिद्धिविनायक मंदिरात... - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

क्रिती सेनॉनला 'मिमी'साठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. या सन्मानानंतर ती सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आपल्या कुटुंबासह पोहोचली. याठिकाणी तिला पापाराझीने स्पॉट केलं.

kriti sanon
क्रिती सेनॉन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2023, 5:33 PM IST

मुंबई : क्रिती सेनॉनला सुपरहिट चित्रपट 'मिमी'साठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये बॉलिवूड आणि साऊथच्या चित्रपटांनी चांगलीच धमाल केली आहे. दरम्यान आता या सन्मानानंतर क्रिती सेनॉनने सर्वप्रथम गणपती बाप्पाचे आभार मानले. क्रिती सेनॉन ही नुकतीच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आली होती. यावेळी तिच्यासोबत तिची धाकटी बहीण नुपूर सेनॉनही होती. क्रितीचा सिद्धिविनायक मंदिरातला व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत क्रिती सेनॉन पिवळ्या रंगाच्या सलवारमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

क्रिती सेनॉन झाली स्पॉट : सिद्धिविनायक मंदिरात प्रार्थना केल्यानंतर क्रितीला याठिकाणी पापाराझीने स्पॉट केलं. क्रितीने पापाराझींना पोझ दिल्या आणि लोकांच्या कौतुकाचंही स्वागत केलं. त्यानंतर क्रिती सेनॉनने आई-वडील आणि बहिणीसोबत कॅमेऱ्यासाठी पोझ दिली. यासोबत तिनं काही लोकांसोबत आनंदाने अनेक फोटो देखील क्लिक केले. सोशल मीडियावर क्रितीच्या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी पूर्णपणे पात्र विजेती म्हणत आहेत, तर काही वापरकर्ते 'आदिपुरुष' असा उल्लेख करून तिची खिल्ली उडवत आहेत.

चाहत्यांच्या कमेंट : एका युजरने तिच्या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलंय कीे 'आदिपुरुष'साठीही तिला पुरस्कार मिळायला हवा'. त्यानंतर आणखी एका यूजरने लिहिले की, क्रिती सेनॉन बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे, खूप खूप अभिनंदन'.अशा अनेक कमेंट क्रितीच्या पोस्टवर येत आहेत. 'आदिपुरुष'नंतर क्रिती लवकरच टायगर श्रॉफसोबत 'गणपत पार्ट १' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २० ऑक्टोबर २०२३ रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टायगरची अ‍ॅक्शन प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. 'गणपत पार्ट १'कडून क्रितीला खूप अपेक्षा आहेत. कारण यापूर्वी तिचा प्रभाससोबतचा 'आदिपुरुष' सपशेल आपटला होता. याशिवाय या चित्रपटाला पॅन इंडिया बनणार आहे. हिंदी व्यतिरिक्त 'गणपत पार्ट १' तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. या दोघांची जोडी 'हिरोपंती' चित्रपटातही दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

हेही वाचा :

  1. Gadar 2 Vs Omg 2 Box Office Collection Day 15 : रिलीजच्या १५व्या दिवशी 'गदर २' आणि 'ओ माय गॉड २'च्या कमाईचा वेग मंदावला...
  2. Malaika Arjun Breakup : मलायका आणि अर्जुनचा ब्रेकअप? वाचा काय म्हणाली रिलेशनमध्ये ट्विस्ट आणणारी कुशा...
  3. Dream Girl 2 Box Office Collection : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर 'ड्रीम गर्ल २'चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.