ETV Bharat / entertainment

रणवीर सिंगच्या उर्जेबद्दल अजय देवगण म्हणतो, 'त्याचं तोंड बंद करावं किंवा आपले कान झाकावे' - कॉफी विथ करण सीझन 8

Ajay Devgn on Ranveer Singh energy : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि चित्रपट निर्माता रोहित शेट्टी कॉफी विथ करण शोच्या आठव्या सीझनमधील आगामी एपिसोडमध्ये होस्ट करण जोहरसोबत सामील होतील. यावेळी अनेक धमाल मस्तीचे किस्से रोहित आणि अजयकडून करण जोहर वदवून घेणार आहे.

Ajay Devgn on Ranveer Singh energy
रणवीर सिंगच्या उर्जेबद्दल अजय देवगण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2023, 7:16 PM IST

मुंबई - Ajay Devgn on Ranveer Singh energy : 'कॉफी विथ करण'च्या आठव्या सीझनने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केले आहे. आतापर्यंत प्रसारित झालेल्या सर्व एपिसोड्समधून अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. अनेक कलाकारांची रहस्ये या निमित्तानं जगजाहीर झाली. या सीझनच्या आगामी एपिसोडमध्ये प्रेक्षकांना बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि चित्रपट निर्माता रोहित शेट्टी यांच्यातील मनोरंजक गप्पा गोष्टींची मोजवाणी मिळणार आहे. आगामी 'सिंघम अगेन' या चित्रपटामधील ही लोकप्रिय जोडी दिग्दर्शक-होस्ट करण जोहरसोबत सोफ्यावर विरजमान होणार आहे.

नव्याने रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी दोघेही नेहमीप्रमाणेच धमाकेदार दिसत आहेत. करण जोहर एका हलक्या-फुलक्या प्रश्नाने एपिसोडला सुरुवात करतो आणि अजयला त्याच्या यशाबद्दलच्या विचारतो. त्यांचा चित्रपट ब्लॉकबस्टर झाला की नाही याची पर्वा न करता, अजय आणि सलमान अनेकदा सेटवर त्यांच्या व्हॅनच्या बाहेर कसे फिरताना दिसतात हे रोहितने खेळकरपणे सांगितले आहे.

उत्साही रणवीर सिंगसोबत काम करण्याबद्दल विचारले असता दिग्दर्शक रोहित शेट्टीने सेटवर त्याच्या उपस्थितीने ऊर्जा निर्माण होते हे कबूल केलं. यावर अजय देवगण विनोदीपणे म्हणाला की रणवीर सेटवर हजर असताना त्याचं एकतर तोंड बंद करावे लागते किंवा कान झाकून घ्यावे लागतात. यावेळी अजयनेही स्वतःबद्दलचे काही मनोरंजक किस्से सांगितले. त्यानं पापाराझींना विमानतळावर का टाळतो किंवा त्यांना पार्ट्यांना का आमंत्रण देत नाही याबद्दलही सांगितले.

रोहित शेट्टीने रणवीर सिंग कसा खोडकर आहे याचे बरेच किस्से यावेळी कथन केले. फिल्म इंडस्ट्रीतला त्याचा प्रतिस्पर्धी कोण राहिला आहे असे करणने विचारताच अजय देवगण म्हणाला, 'वन्स अपॉन टाईम'मध्ये तूच माझा प्रतिस्पर्धी होता. असे म्हणताच सर्वजण हसायला लागले. या एपिसोडमध्ये धमाल होणार असल्याची खात्रीच अजय आणि रोहित शेट्टीच्या चर्चेवरुन दिसत आहे.

हेही वाचा -

1. विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर'नं 100 कोटींचा टप्पा केला पार

2. जेठालाल उर्फ दिलीप जोशी यांच्या मुलाच्या लग्नात 'तारक मेहता'च्या कलाकारांनी लावली हजेरी

3. 'सालार'च्या तुलनेत 'डंकी'ची बॉक्स ऑफिसवर मोठी आघाडी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.