ETV Bharat / entertainment

Koffee With Karan 8 : रणवीरनं सांगितला दीपिकाच्या नैराश्येचा किस्सा, करण जोहरलाही आला होता पॅनिक अटॅक - करण जोहरनं केला खुलासा

Koffee With Karan 8 : करण जोहरचा टॉक शो 'कॉफी विथ करण'चा 8 वा सीझन सध्या चर्चेत आला आहे. या शोमध्ये करण जोहर, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी नैराश्याच्या लढाईबद्दल बोलताना अनेक खुलासे केले आहेत.

Koffee With Karan 8
कॉफी विथ करण 8
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 12:55 PM IST

मुंबई - Koffee With Karan 8 : करण जोहरचा प्रसिद्ध टॉक शो 'कॉफी विथ करण' सीझन 8 हा अनेकदा गॉसिपमुळे चर्चेत असतो. या शोमध्ये नुकतेच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या स्टार कपलनं हजेरी लावली होती. या शोमध्ये दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नाचे न पाहिलेले फुटेज दाखवण्यात आले, तेव्हा होस्ट करण जोहर भावनांनी भारावून गेला होता. या शो दरम्यान नैराश्याच्या लढाईबद्दल बोलताना करण, रणवीर आणि दीपिका हे तिघेही खूप भावूक झाले होते. दीपिकाच्या नैराश्याच्या लढाईबद्दल बोलताना रणवीर सिंग यावेळी सांगितलं की, दीपिका जेव्हा डिप्रेशनमधून जात होती, तेव्हा मी तिच्यासोबत होतो. पुढं त्यानं म्हटलं, हे सर्व समजण्यासाठी मला बराच वेळ लागला होता. 'जेव्हा 2014 मध्ये पहिल्यांदा हे घडले, तेव्हा मी शूटिंग करत होतो. तिनं कॉल केला आणि म्हटलं, मला ब्लॅकआउट झाला आहे आणि मी पडले आहे. मी घरी येऊ का?' मी कॉल डिस्कनेक्ट केला, तेव्हा माझ्या बाईकवर होतो. जेव्हा मी तिथे पोहोचलो आणि तिला पाहिले तेव्हा ती ठिक नव्हती. ती माझ्याकडे पाहत होती. त्यावेळी ती पूर्णपणे वेगळी झाली होती'.

रणवीरनं पुढं सांगितलं की, 'एक दिवस नाश्ता करत असताना दीपिका माझ्याजवळ बसली होती आणि ती फक्त रडत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. जेव्हा मी तिला विचारल काय झालं, तेव्हा तिला काय बोलावं तेच कळत नवतं, अशी तिची अवस्था झाली होती. तो एक असा क्षण होता जेव्हा, मला असहाय्य वाटत होतं. याबाबत माहिती नसल्यानं मी दीपकच्या कुटुंबीयांना फोन केला, त्यानंतर ते थेट मुंबईला आले'. याशिवाय या शोमध्ये करण जोहरनं त्याच्या मानसिक आरोग्याशी लढा देण्याबाबत काही धक्कादायक खुलासे केले. करणनं सांगितलं की, नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या (NMACC) उद्घाटनाच्या वेळी त्याला पॅनीक अटॅक आला होता.

वरुण धवननं केली करण जोहरची मदत : करण जोहरनं पुढं सांगितलं की त्याला अचानक खूप घाम येऊ लागला, तेव्हा त्याला काय करावे हे समजत नव्हतं. त्याला स्थिर होण्यासाठी त्रास होत होता. त्यानंतर त्याला वरुण धवननं एका रिकाम्या खोलीत नेलं आणि कपडे घालण्यास मदत केली. त्यानंतर तो घरी गेला आणि रडत झोपला. पुढं त्यानं म्हटलं, 'माझे हात थरथरत होते. मी काही श्वासोच्छवासाचे व्यायाम केले आणि मला असं वाटलं की हा हृदयविकाराचा झटका आहे की काय. त्यानंतर मी जॅकेट काढलं. अर्ध्या तासानंतर मी यामधून बाहेर आलो. त्यावेळी मी माझ्या बेडवर बसून रडलो. मी का रडत आहे हे मला समजत नव्हत'. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा प्रीमियर होणार असल्यानं तो दबावाखाली होता. करण जोहर अजूनही औषधे घेत आहे.

हेही वाचा :

  1. Tejas Box Office Collection Day 2: कंगना रणौत स्टारर 'तेजस' चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ...
  2. Ananya And Aditya : आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे डिनर डेटवर झाले स्पॉट ; व्हिडिओ व्हायरल...
  3. MAMI Film Festival 2023: मामी फिल्म फेस्टिव्हलमधील प्रियंका चोप्राचा रेड कार्पेट लूक पाहून निक जोनास झाला थक्क

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.