मुंबई : खंडाळा येथे फार्म हाऊसवर अवघ्या शंभर पाहुण्यांच्या उपस्थितीत केएल राहुल आणि अथिया शेट्टीने लग्नगाठ बांधली. या लग्नाबाबत दोन्हीकडच्या कुटुंबांनी कामालीची गुप्तता पाळली होती. कोणालाही त्यांच्या लग्नाबाबत सांगण्यात आले नव्हते. क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री अथियाने त्यांच्या कमिटमेंट्स आणि बिझी शेड्युलमुळे त्यांची हनिमून ट्रिप रद्द केली आहे. हा हनिमून प्लॅन मे महिन्यात करता येईल. याचे कारण म्हणजे केएल राहुलचे शेड्यूल खूपच पॅक आहे.
केएल राहुलचे शेड्यूल : केएल राहुलला फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरची कसोटी मालिका खेळायची आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी संघाची घोषणा केली असून त्यात राहुलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान नागपुरात खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर केएल राहुलला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्येही खेळायचे आहे. राहुल हा आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आहे. हे आयपीएल मार्चच्या अखेरीपासून ते मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत चालू शकते. त्यामुळेच पुढील तीन महिने राहुल खूप व्यस्त असणार आहे.
आयपीएलनंतर रिसेप्शन होणार : पत्रकारांनी विचारले की, लग्नाचे रिसेप्शन कधी होणार? यावर प्रतिक्रिया देताना सुनील शेट्टी म्हणाले की, आयपीएलनंतरच हे होईल. राहुल आणि अथियाच्या लग्नासाठी दोघांचे कुटुंब स्वतंत्रपणे दोन मोठे रिसेप्शन देणार आहेत. हे रिसेप्शन मुंबई आणि बंगळुरूमध्ये होणार आहेत. दुसरीकडे, अथिया शेट्टीने नुकतेच तिचे यूट्यूब चॅनल लॉन्च केले आहे. राहुल आणि अथिया हनीमूनसाठी युरोपला जाणार आहेत. त्याचवेळी, अथियाचे वडील आणि बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता सुनील शेट्टी यांनी लग्नानंतर एक मोठा रिसेप्शनही आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. पण हे रिसेप्शन आयपीएलनंतर होणार आहे.
या ठिकाणी रिसेप्शनची ग्रँड पार्टी होणार : अथिया आणि के एल राहुल या दोघांच्याही कुटुंबांनी या लग्नाबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. तर दोन्ही कुटुंब आणि जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार मिळून केवळ शंभर लोकांमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. या लग्न सोहळ्याला सिनेजगतातून अनुपम खेर, अर्जुन कपूर, जॅाकी श्रॉफ आणि क्रिकेट जगतातील इशान शर्मा यांनी हजेरी लावली होती. लवकरच लग्नाची ग्रँड रिसेप्शन पार्टी दोन्ही कुटुंबाकडून आयोजित करण्यात येणार आहे. या पार्टीला सिनेजगतातील लोक आणि क्रिकेट जगतातील मोठे स्टार उपस्थित राहतील.