ETV Bharat / entertainment

केकेच्या मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल, गाताना स्टेजवरुन असा निघाला होता गायक - केके मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

KK Singer Video Viral : गायक केके यांच्या मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे...ज्यात गायकाच्या चेहऱ्यावर अस्वस्थता पाहायला मिळत आहे...

केकेच्या मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
केकेच्या मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
author img

By

Published : Jun 1, 2022, 12:47 PM IST

मुंबई - KK Singer Video Viral : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ (केके) यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे एका मैफिलीत आजारी पडल्याने निधन झाले. ते केके या नावाने प्रसिद्ध होते. वयाच्या ५३ व्या वर्षीही ते रसिकांमध्ये पूर्ण उत्साहाने गाणे म्हणत होते. अचानक गायकाला अस्वस्थ वाटू लागले आणि ते स्टेजवरून खाली उतरले. पाहूया केकेच्या मृत्यूपूर्वीचा तो व्हिडिओ..

व्हायरल व्हिडिओमध्ये गायक केके कॉन्सर्टमधून अस्वस्थपणे धावताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केकेच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना सीएमआरआय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच सिंगरचा मृत्यू झाला.

दरम्यान, आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.. ज्यामध्ये गायक चाहत्यांच्यामध्ये सहज गाताना दिसत असून अचानक स्टेज सोडून परत येतो आणि माइक काढताना दिसत आहे.

त्याचवेळी त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी कर्मचारी धावतात. येथे चाहते त्यांच्यामध्ये सेल्फी घेण्यात व्यस्त दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, छातीत दुखणे आणि स्ट्रोक हे गायकाच्या मृत्यूचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

त्याचवेळी सिंगरच्या डोक्यावर काही जखमांच्या खुणाही आढळल्या असून, त्यानंतर गुन्हा दाखल करून पोलीस तपास करत आहेत. बुधवारी गायक केके यांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. गायक केके याचे कॉन्सर्टला जाण्यापूर्वीच अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा - संगीत मैफिलीनंतर गायक केकेचे निधन, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच झाला मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.