ETV Bharat / entertainment

किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज'चा धमाल टिझर रिलीज - किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज

किरण राव आगामी 'लापता लेडीज' या चित्रपटातून दिग्दर्शकाच्या खुर्चीत परतली आहे. हा चित्रपट किरणच्या बॅनर किंडलिंग पिक्चर्स आणि आमिर खान प्रॉडक्शनद्वारे संयुक्तपणे बनवला जाणार आहे. या चित्रपटाचा धमाल टिझर रिलीज झाला आहे.

किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज'चा धमाल टिझर रिलीज

author img

By

Published : Aug 11, 2022, 10:26 AM IST

मुंबई - चित्रपट निर्माती किरण रावने दिग्दर्शित केलेला 'लापता लेडीज' हा चित्रपट पुढील वर्षी ३ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, अशी घोषणा निर्मात्यांनी बुधवारी केली. 2011 च्या धोबीघाट चित्रपटानंतर किरण रावने दिग्दर्शित केलेला हा दुसरा विनोदी चित्रपट आहे.

लापता लेडीज हा ग्रामीण बाज असलेला विनोदी चित्रपट आहे. यामध्ये दोन नववधू ट्रेनमधून गायब झाल्यानंतर उडालेला गोंधळ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खानसोबत किरण रावने केली आहे. किरण दहा वर्षानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळली आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

लापता लेडीज चित्रपटाचा धमाल टिझर रिलीज करण्यात आलाय. चित्रपटाची झलक पाहताना धमाल वाटत आहे. स्नेहा देसाई यांनी याची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत, अतिरिक्त संवाद दिव्यानिधी शर्मा यांनी दिले आहेत. लापता लेडीजमध्ये नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवी किशन हे कलाकार आहेत. किरण राव तिच्या किंडलिंग प्रॉडक्शनद्वारे चित्रपटाची निर्मितीही करत आहे.

हेही वाचा - राजू श्रीवास्तवची प्रकृती चिंताजनक, एम्समध्ये व्हेंटिलेटरवर उपचार सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.