रॉकिंग स्टार यश याची जबरदस्त भूमिका असलेला KGF Chapter 2 हा चित्रपट आज थिएटरमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटाला हिंदी भाषिक पट्ट्यात जबरदस्त प्रतिस्द मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे एसएस राजामौलीच्या RRR च्या हिंदी आवृत्तीचा आगाऊ बुकिंग रेकॉर्ड KGF 2 ने मागे टाकला आहे. रिलीजच्या चार दिवस आधीच चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने आधीच ₹11 कोटी किमतीची तिकिटे विकण्यात यश मिळवले आहे. त्या तुलनेत, RRR च्या हिंदी आवृत्तीने आगाऊ बुकिंगमध्ये फक्त ₹5 कोटींची कमाई केली होती. व्यापार विश्लेषकांच्या मते, कन्नड चित्रपटाने एकट्या उत्तर भारतातील सर्व भाषांमध्ये आगाऊ बुकिंगमध्ये ₹20 कोटींची कमाई केली आहे.
-
#Xclusiv... 'KGF 2' 6 AM SHOWS & MORE...
— taran adarsh (@taran_adarsh) April 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🔥 #KGF2 advance booking PHENOMENAL
🔥 Morning shows to start as early as 6 am in #Mumbai and #Pune
🔥 Ticket prices at *select locations*: ₹ 1450 / ₹ 1500 per seat [#Mumbai] and ₹ 1800 / ₹ 2000 per seat [#Delhi]#Toofan is arriving! pic.twitter.com/wnv5aaZQ1j
">#Xclusiv... 'KGF 2' 6 AM SHOWS & MORE...
— taran adarsh (@taran_adarsh) April 9, 2022
🔥 #KGF2 advance booking PHENOMENAL
🔥 Morning shows to start as early as 6 am in #Mumbai and #Pune
🔥 Ticket prices at *select locations*: ₹ 1450 / ₹ 1500 per seat [#Mumbai] and ₹ 1800 / ₹ 2000 per seat [#Delhi]#Toofan is arriving! pic.twitter.com/wnv5aaZQ1j#Xclusiv... 'KGF 2' 6 AM SHOWS & MORE...
— taran adarsh (@taran_adarsh) April 9, 2022
🔥 #KGF2 advance booking PHENOMENAL
🔥 Morning shows to start as early as 6 am in #Mumbai and #Pune
🔥 Ticket prices at *select locations*: ₹ 1450 / ₹ 1500 per seat [#Mumbai] and ₹ 1800 / ₹ 2000 per seat [#Delhi]#Toofan is arriving! pic.twitter.com/wnv5aaZQ1j
फिल्म ट्रेड अॅनालिसिस प्लॅटफॉर्म इंडियन बॉक्स ऑफिसच्या ट्विटनुसार, चित्रपटाने उत्तर भारतात आधीच ₹20 कोटी किमतीची तिकिटे विकली आहेत, ज्यामध्ये फक्त हिंदी आवृत्तीसाठी ₹11.4 कोटींचा समावेश आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीही हिंदी पट्ट्यातील चित्रपटाच्या 'अभूतपूर्व' क्रेझबद्दल ट्विट केले आहे. "KGF 2' चा सकाळी 6 वा. शो होत आहे आणि बरेच काही...#KGF2 चे आगाऊ बुकिंगही अभूतपूर्व. मॉर्निंग शो #मुंबई आणि #पुणे मध्ये सकाळी 6 वाजता सुरू होतील. *निवडक ठिकाणी* तिकिटांच्या किंमती: ₹ 1450 / ₹ 1500 प्रति सीट झाल्या आहेत[ #मुंबई] आणि दिल्ली येथे या तिकीटांचा दर ₹ 1800 / ₹ 2000 प्रति सीट इतका आहे. #तुफान येत आहे," असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
KGF: Chapter 2, प्रशांत नील दिग्दर्शित, 2018 च्या हिट KGF: Chapter 1 चा सिक्वेल आहे. पहिल्या चित्रपटाने जागतिक स्तरावर ₹250 कोटी कमावले होते. कर्नाटकाबाहेर चित्रपटाच्या सिक्वेलची वाढलेली क्रेझ आणि मोठ्या रिलीजची अनुपस्थिती लक्षात घेता, सीक्वल हा आकडा सहज पार करेल अशी अपेक्षा आहे. KGF हा चित्रपट रॉकी (यश) च्या उदयाविषयी आहे, जो कोलार गोल्ड फील्ड्समधील सोन्याच्या खाणीचे साम्राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो. या चित्रपटात संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज यांच्याही भूमिका आहेत.
KGF: Chapter 2 हा चित्रपट 14 एप्रिल रोजी पडद्यावर रिलीज झाला आहे. याआधी, याच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या शाहिद कपूरची भूमिका असलेल्या जर्सी चित्रपटाकडून कडून या चित्रपटाला उत्तरेत काही स्पर्धेला सामोरे जावे लागेल अशी अपेक्षा होती. तथापि, सोमवारी, जर्सीची रिलीजची तारीख 22 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली.
विजय आणि पूजा हेगडे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या आणि 13 एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या बीस्ट या तमिळ चित्रपटापासून या चित्रपटाला दक्षिणेत अजूनही काही स्पर्धेला सामोरे जावे लागेल. हा चित्रपट किमान तमिळ आणि तेलुगू भाषेतील बाजारपेठेत KGF 2 ला मागे टाकेल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा - Kgf Chapter 2 : रॉकी भाईच्या चाहत्यांनी केले Kgf 2 चे भव्य स्वागत