ETV Bharat / entertainment

'केजीएफ' फेम अभिनेता मोहन जुनेजा यांचे निधन

author img

By

Published : May 7, 2022, 3:37 PM IST

रॉकिंग स्टार यश याची भूमिका असलेल्या 'केजीएफ' या चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये दिसलेले ज्येष्ठ अभिनेता मोहन जुनेजा यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.

मोहन जुनेजा यांचे निधन
मोहन जुनेजा यांचे निधन

हैदराबाद - साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी येत आहे. 'केजीएफ' या ब्लॉकबस्टर चित्रपटात दिसलेले अभिनेता मोहन जुनेजा यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. अभिनेता मोहन जुनेजा बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर बेंगळुरू येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मोहन यांनी केजीएफ २ या चित्रपटात शेवटचे काम केले आहे.

मोहन यांनी दशकभरात अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका केली. मोहन जुनेजा यांनी तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषांमधील शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मोहन जुनेजा हे त्यांच्या उत्कृष्ट व्यक्तिरेखेसाठी प्रसिद्ध आहेत. केजीएफ मधील भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील पहिला आणि मोठा ब्रेक होता. याशिवाय मोहन टीव्ही सीरियल 'विटारा'सह अनेक टीव्ही मालिकांमध्येही दिसले आहेत. मोहन यांचा अभिनय प्रेक्षकांना अतिशय सशक्त आणि खरा वाटला. अभिनेत्याच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत आणि त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

मोहन कर्नाटकातील तुमकूर येथील रहिवासी होते. येथून शिकल्यानंतर ते कामानिमित्त बंगळुरू शहरात आले होते. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

हेही वाचा - शालीन सौंदर्यवती प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो पाहा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.