बेंगळुरू - कन्नड सुपरस्टार यश याची प्रमुख भूमिका असलेला केजीएफ : चॅप्टर २ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवत आहे. साऊथच्या या ब्लॉकबस्टर चित्रपटाने जगभरात १ हजार कोटींचा कमाईचा टप्पा ओलांडला आहे.
प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा कर्नाटकातील पहिला चित्रपट आहे. दंगल, बाहुबली 2 आणि RRR नंतर हा हजार कोटीची कमाई करणारा हा चौथा चित्रपट ठरला आहे. KGF 2 ची हिंदी आवृत्ती संग्रह वाढवत राहिली. चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने जोरदार कमाई करणे सुरू ठेवले आहे, रिलीजच्या १६ व्या दिवशी चित्रपटाने ५.०१ कोटी कमावले. हिंदीसाठी बॉक्स ऑफिसवरील एकूण संकलन 416.60 कोटी रुपये झाले आहे.
-
Finaly #KGF2 Grossed 1000 Crores In A Global Market In Just 15 Days✅💥
— KGFChapter:2 (@KGFChapter2) April 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
After #Dangal #Bahubali2 And #RRR Its 4th Movie To Join 1000 Crores Club From India💥
Yes Its A Time And Make A Way To Celebrate Sandalwood's First 1000 Crores Movie💥#KGFChapter2 #KGFChapter3 pic.twitter.com/G83yFVNU4V
">Finaly #KGF2 Grossed 1000 Crores In A Global Market In Just 15 Days✅💥
— KGFChapter:2 (@KGFChapter2) April 29, 2022
After #Dangal #Bahubali2 And #RRR Its 4th Movie To Join 1000 Crores Club From India💥
Yes Its A Time And Make A Way To Celebrate Sandalwood's First 1000 Crores Movie💥#KGFChapter2 #KGFChapter3 pic.twitter.com/G83yFVNU4VFinaly #KGF2 Grossed 1000 Crores In A Global Market In Just 15 Days✅💥
— KGFChapter:2 (@KGFChapter2) April 29, 2022
After #Dangal #Bahubali2 And #RRR Its 4th Movie To Join 1000 Crores Club From India💥
Yes Its A Time And Make A Way To Celebrate Sandalwood's First 1000 Crores Movie💥#KGFChapter2 #KGFChapter3 pic.twitter.com/G83yFVNU4V
व्यापार विश्लेषक हिमेश मंकंद यांनी ट्विट केले, "हे १००० नॉट आउट आहे! KGF - Cchapter2 ने जागतिक बॉक्स ऑफिसवर रु. 1000 कोटी क्लबचा टप्पा ओलांडला आहे. दंगल, बाहुबली2 आणि RRR नंतर यश स्टारर हा चौथा भारतीय चित्रपट ठरला आहे. चार अंकी संख्या असलेला मूळ कन्नड असलेला पहिला चित्रपट. खरंच ऐतिहासिक"
शनिवारी चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी देखील ट्विटरवर घोषणा केली की "KGF - Chapter2 ने जगभर बॉक्स ऑफिसवर 1,000 कोटीचा ग्रॉस मार्क ओलांडला आहे. दंगल, बाहुबली2 आणि RRR नंतर असे करणारा हा केवळ चौथा भारतीय चित्रपट आहे. "
त्याच्या निर्मात्यांसाठी अधिक चांगली बातमी म्हणजे, KGF 2 हा भारतातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट म्हणून उदयास आला आहे आणि त्याच्या कलेक्शनने सुपरहिट टायगर जिंदा है, पीके आणि संजूच्या कमाईला मागे टाकले आहे. ''KGF-चॅप्टर 2'' हा चित्रपट 14 एप्रिल रोजी धमाकेदार रिलीज झाला होता. ज्याने सुरुवातीच्या दिवसातील सर्वाधिक कलेक्शन नोंदवले. पहिल्या आठवड्याच्या शेवटी आणि सुरुवातीच्या आठवड्यात सर्वाधिक कमाई नोंदवणारा हिंदी चित्रपट म्हणून त्याने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. 250 कोटींची कमाई करणारा हा सर्वात जलद हिंदी चित्रपट ठरला आहे.
हेही वाचा - Rakesh Maria Biopic : राकेश मारिया यांच्या बायोपिकची रोहित शेट्टीने केली घोषणा