ETV Bharat / entertainment

कतरिना कैफनं सांगितला तिचं हेलिकॉप्टर कोसळतानाचा भीषण अनुभव - कतरिना कैफ पघाताचा अनुभव

Katrina Kaifs terrible experience : कतरिना कैफनं तिच्या आयुष्यात घडलेल्या सर्वात भीषण प्रसंगाबद्दल सांगितलं आहे. तिचं हेलिकॉप्टर कोसळत असताना ती थोडक्यात वाचली होती. त्यावेळी तिला आपलं आयुष्य संपलं असंच वाटलं होतं.

Katrina Kaifs terrible experience
कतरिना कैफ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 5:31 PM IST

मुंबई - Katrina Kaifs terrible experience : अभिनेत्री कतरिना कैफ चित्रपटांमध्ये धाडसी स्टंटसाठी ओळखली जाते तितकीच ती तिच्या निष्णात डान्सिंग चॉप्ससाठीही प्रसिद्ध आहे. यापूर्वी आव्हानात्मक अ‍ॅक्शन सीक्वेन्ससाठी शूटिंग करत असताना सेटवर तिला अपघातही झाला होता. अनेक वेदना तिनं शूटिंगच्या दरम्यान सहन केल्या आहेत. इतकच नाही तर हेलिकॉप्टर राईड दरम्यान ती अगदी मृत्यूच्या खाईत लोटली गेली होती. हा अनुभव तिच्यासाठी खूपच त्रासदायक होता, ज्यामुळे ती पुरती हादरली होती. त्या क्षणी तिला असं वाटलं होतं की आपल्या आयुष्याचा शेवट जवळ आला आहे.

कतरिनाचा एक थ्रोबॅक व्हिडिओ समोर आलाय. तिच्या ब्युटी लाइनच्या प्रमोशनल इव्हेंटदरम्यान, कतरिनाला मृत्यूच्या जवळच्या परिस्थितीचा सामना करण्याबद्दल विचारण्यात आले. ज्यामध्ये ती आपल्या आयुष्यात आलेल्या भीषण प्रसंगाबद्दल सांगताना दिसते. ती म्हणाली की तिचे हेलिकॉप्टर कोसळत होते आणि खाली जात असताना आपलं आयुष्य इथेच संपलंय असं तिला वाटलं होतं. या घटनेमुळं ती खूप हादरली होती. हा थरारक अनभव तिला आयुष्यभर न विसरता येणार आहे. त्या भयावह क्षणी तिची पहिली काळजी तिच्या आईच्या आरोग्याची वाटत होती.

अभिनेत्री कतरिना कैफनं आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून सुरू केली होती हे आपण जाणतो. त्यानंतर तिला सलमान खाननं साथ दिली आणि हिंदी चित्रपटसृष्टीत ती आघाडीची अभिनेत्री म्हणून नावारुपाला आली. ती या क्षेत्रात आल्यानंतर मेहनतीनं हिंदी भाषाही तिनं आत्मसात केली आहे. एक यश्वी अभिनेत्री असण्यासोबतच तिनं एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही नाव कमावलंय. तिनं चार वर्षापूर्वी 'के ब्युटी' हा ब्रँड सुरू केला. या ब्रँडचे अनेक ब्युटी प्रॉडक्ट मार्कटमध्ये पाहिला मिळतात. या प्रॉडक्टची विक्री तिनं ऑन लाईन सुरू केली होती. तिच्या व्यवसायाला आता गती मिळाली असून आता तिचा ब्युटी ब्रँड एक मोठा ब्रँड झाला आहे.

चित्रपटाच्या आघाडीवर कतरिना कैफ 'टायगर 3' च्या यशाचा आनंद साजरा करत आहे. सलमान खानसोबतचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरपूर यश मिळवत आहे. या चित्रपटात ती झोया ही भूमिका साकारत आहे. ती विजय सेतुपतीसोबत 'मेरी ख्रिसमस' चित्रपटात झळकणार आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित 'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट आधी 23 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र याचं रिलीज पुढे ढकलण्यात आलंय. आता हा चित्रपट 12 जानेवारी 2024 ला रिलीज होईल.

हेही वाचा -

  1. सलमान खानची भाची अलीझेह अग्निहोत्रीच्या डेब्यू चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग

2. कतरिना कैफ उत्कृष्ट अभिनेत्रीसोबत 'या' ब्रँडची आहे मालकीन

3. 'टायगर 3'च्या सक्सेस पार्टीत भाईजाननं विकी कौशलवर भाष्य करताच लाजली कतरिना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.