ETV Bharat / entertainment

कॅटरिना कैफ खरंच प्रेग्नंट आहे का? अभिनेत्रीच्या टीमने केला खुलासा - कॅटरिना प्रेग्नसी बातम्या

कॅटरिना कैफ गरोदर आहे... या बातमीचे पुन्हा एकदा वारे वाहू लागले आहेत. कॅटरिना कैफ खरंच प्रेग्नंट आहे की नाही? या बातमीवर अभिनेत्रीच्या टीमचे वक्तव्य आले आहे, ज्यामध्ये सर्व सत्य समोर आले आहे.

कॅटरिना कैफ
कॅटरिना कैफ
author img

By

Published : May 14, 2022, 11:50 AM IST

मुंबई - बॉलिवूडची 'बार्बी डॉल' कॅटरिना कैफ प्रेग्नंट असल्याची आणखी एक अफवा पसरली आहे. कॅटरिनाच्या प्रेग्नेंसीची अफवा सोशल मीडियावर जोर धरत आहे. अभिनेत्री गरोदर असल्याच्या बातम्यांची ही दुसरी वेळ आहे. आता कॅटरिना कैफ खरंच प्रेग्नंट आहे का? कॅटरिना आणि विकी होणार आई-वडील? या बातमीचे सत्य समोर आले आहे.

वास्तविक, कॅटरिना कैफच्या प्रेग्नेंसीबद्दल वारंवार येत असलेल्या अफवांवर अभिनेत्रीच्या टीमकडून एक निवेदन आले आहे, ज्यामध्ये या सर्व अफवा फेटाळून लावण्यात आल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅटरिना कैफच्या टीमने हे सर्व दावे खोटे ठरवले आहेत. यासोबतच कॅटरिना प्रेग्नंट नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

न्यूयॉर्कमधील सोना रेस्टारंटमध्ये विकी आणि कॅटरिना

विकी आणि कॅटरिना सध्या सुट्टीवर आहेत आणि त्यांचे सुंदर फोटो शेअर करत आहेत. याआधी कॅटरिनाने ब्रिटनमधील तिच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये पती विकी कौशलसोबत नाश्ता करतानाचे फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती पती विकीसोबत खूप आनंदी आणि सुंदर दिसत होती. त्यानंतर हे जोडपे न्यूयॉर्कमधील प्रियंका चोप्राच्या सोना या रेस्टारंटमध्ये पोहोचले होते. या ठिकाणावरील फोटोही दोघांनी शेअर केले होते.

वर्क फ्रंटवर, कॅटरिना ही श्रीराम राघवनच्या आगामी 'मेरी ख्रिसमस' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या थ्रिलरमध्ये तमिळ सुपरस्टार विजय सेतुपती देखील मुख्य भूमिकेत आहे. तिने गुरमीत सिंग दिग्दर्शित 'फोन भूत'चे शूट पूर्ण केले आहे. कॅटरिनासोबत या चित्रपटात अभिनय राज सिंग, जॅकी श्रॉफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर देखील आहेत.

विक्कीबद्दल बोलायचे तर, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्याकडे निर्मितीच्या विविध स्तरांवर अनेक प्रोजेक्ट आहेत. सारा अली खान आणि मेघना गुलजार यांच्या 'सॅम बहादूर'सोबत तो दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्याकडे शशांक खेतानचा 'गोविंदा नाम मेरा' हा चित्रपटही आहे.

विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांनी गेल्या वर्षी ९ डिसेंबरला राजस्थानमध्ये शाही पद्धतीने लग्न केले होते. या लग्नात फक्त खास नातेवाईक आणि जवळचे मित्र पोहोचले होते.

हेही वाचा - Sachin Birthday : सर्वांनाच 'आपला' वाटणाऱ्या सचिन खेडेकरांचा जन्मदिन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.