ETV Bharat / entertainment

अभिनेता मिलिंद शिंदे यांच्या कथेवर बनतोय 'कठपुतली कॉलनी' चित्रपट!

आपल्या बेफाट अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता मिलिंद शिंदे आता वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मिलिंद शिंदे यांच्या कथेवर एक चित्रपट बनत असून त्याचे नाव आहे, ‘कठपुतली कॉलनी'. निर्माते शामराव कृष्णाई पांडुरंग ससाने यांनी शाम ससाणे क्रिएशन्सच्या बॅनरखाली नुकतीच या चित्रपटाची घोषणा केली आहे.

'कठपुतली कॉलनी' चित्रपट
'कठपुतली कॉलनी' चित्रपट
author img

By

Published : May 9, 2022, 5:36 PM IST

मुंबई - मराठी चित्रपट त्याच्या आशयघनतेसाठी ओळखला जातो. अनेक सक्षम कलाकार मराठी चित्रपटांतील अभिनयाने त्यांना वेगळा आयाम देतात. आपल्या बेफाट अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता मिलिंद शिंदे आता वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मिलिंद शिंदे यांच्या कथेवर एक चित्रपट बनत असून त्याचे नाव आहे, ‘कठपुतली कॉलनी'. प्रत्येक चित्रपट काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्याप्रमाणे हा चित्रपटही काहीतरी वेगळे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, तेही वेगळ्या पद्धतीने. प्रत्येक चित्रपटाच्या टायटलमध्ये काही ना काही दडलेलं असतं, तसंच 'कठपुतली कॉलनी'मध्ये सुद्धा दडलंय. नेमकं काय दडलंय ते प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच समजेल.

'कठपुतली कॉलनी' चित्रपट
'कठपुतली कॉलनी' चित्रपट

समाजमनापर्यंत एखादा महत्त्वपूर्ण संदेश किंवा मुद्दा पोहोचवण्यात मराठी सिनेमा नेहमी अग्रस्थानी राहिला असल्याचं पहायला मिळालं आहे. असाच एक महत्त्वपूर्ण मुद्दा मांडणाऱ्या नव्या कोऱ्या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली. 'कठपुतली कॉलनी' असं अत्यंत उत्कंठा वाढवणारं या चित्रपटाचं शीर्षक आहे. शीर्षकावरून तरी चित्रपटात काय पहायला मिळणार याचे संकेत मिळत नसले तरी, यात प्रत्येक भारतीयाची गोष्ट असेल असे निर्मात्यांनी सांगितले. निर्माते शामराव कृष्णाई पांडुरंग ससाने यांनी शाम ससाणे क्रिएशन्सच्या बॅनरखाली नुकतीच या चित्रपटाची घोषणा केली आहे.

'कॅापी' फेम दिग्दर्शक दयासागर वानखेडे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. कोणतीही आव्हानात्मक भूमिका लीलया साकारण्यासाठी रसिकांच्या परिचयाचे असणारे मिलिंद शिंदे यांच्या लेखणीतून 'कठपुतली कॉलनी'ची कथा अवतरली आहे. या चित्रपटात मिलिंद शिंदे यांनी महत्त्वाची भूमिकाही साकारली असून, सध्या हिंदीत बिझी असणारे कवी मनाचे अभिनेते किशोर कदमही त्यांच्या जोडीला आहेत. थोडक्यात सांगायचं तर ही एका गावाची, आपल्या घरादाराची, परसदाराची, शिरस्त्याची कहाणी आहे. या सगळ्याला 'अब्रू' नावाचा धगधगता ज्वालामुखी राखण बसलाय. त्या इभ्रतीसाठी एक लपाछपीचा, शिवाशिवीचा खेळ सुरू होतो त्याची गोष्ट 'कठपुतली कॉलनी'मध्ये दडलेली आहे.

दिग्दर्शक दयासागर वानखेडे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, “मिलिंद शिंदे यांनी एक अशी कथा लिहिली आहे, जी वाचताक्षणीच त्यावर सिनेमा बनायला हवा असा विचार मनात आला. एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करत वास्तववादी चित्र दाखवणाऱ्या या चित्रपटात प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं वेगळ्या प्रकारचं कथानक पहायला मिळणार आहे. प्रत्येकाला आपलीशी वाटावी अशी ही गोष्ट असल्याने रसिकांना 'कठपुतली कॉलनी' नक्कीच आवडेल”.

हेही वाचा - शिक्षणाने डॉक्टर असलेल्या 'बर्थ डे गर्ल' साई पल्लवीचे सुंदर फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.